आपला जिल्हा

महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये विकृतपणा

महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये विकृतपणा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डीजे वर व्यक्तिगत गीते वाजवल्याने संगमनेर मधून तीव्र निषेध

महायुतीच्या उर्मट वृत्तीचा राज्यभरातून निषेध

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १४ एप्रिल २०२६जगाला समतेचा व मानवतेचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मोठ्या उत्साहाने अभिवादन सुरू असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व्यक्तिगत आणि उडत्या चालीचे गीते वाजून चालू कार्यक्रमात गोंधळ निर्माण केल्याने या विकृत प्रवृत्ती विरोधात संगमनेर तालुक्यांमधून तीव्र संताप आणि निषेध सुरू झाला आहे. महायुतीच्या डीजे वाजवणाऱ्यांवर आणि पोलीस प्रशासनावर आमदार सत्यजित तांबे यावेळी चांगले संतापले.

जाहिरात

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यान व जीवनगौरव पुरस्कार सुरू असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम गोंधळ निर्माण व्हावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर काही व्यक्तिगत व उडत्या चालीची गीते सुरू केली. अत्यंत शांततेमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये वारंवार अडथळा निर्माण करण्याचे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होते. डीजे चा आवाज वाढवला जात होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ही सर्व गाणी अत्यंत अशोभनीय होती.

जाहिरात

यावर वारंवार सूचना करूनही या कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. यावेळी व्यासपीठावरून आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापले. पोलीस प्रशासन काय करते आहे. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे विचार सांगण्याचे काम सुरू असताना काही लोक मुद्दाम होऊन अडथळे निर्माण करत आहेत. आम्ही 40 वर्ष जयंती मोठ्या आनंदाने सर्वांना घेऊन साजरी करत आहोत. हे कधी कुठे होते का ? असा सवाल करताना असे वर्तन अत्यंत चुकीचे आहे.तातडीने डीजे बंद करा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार यांसह पोलीस त्या ठिकाणी हजर झाले.

काही काळ डीजे बंद केल्यानंतर पुन्हा डीजे सुरू करण्यात आला. यानंतर मात्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते व ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुमताई माघाडे डीजे सुरू असलेल्या ठिकाणी आल्या आणि चांगल्या संतापल्या.

चालू कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालण्याचा तुमचा उद्देश आहे. हे वर्तन अत्यंत बेशिस्त आहे. अशी पद्धत संगमनेर मध्ये कधीच नव्हती. हे घाणेरडे प्रकार तुम्ही सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या माघाडे ताई यांना अत्यंत उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. काही काळ मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सर्व रस्ते ट्रॅफिक जाम झाले. या ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे प्रशासनाची ही तारांबळ उडाली.

हा प्रकार म्हणजे म्हातारी मेल्याचे दुःख नव्हे तर काळ सोकावतो आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली असून या घटनेचा संगमनेर तालुक्यासह राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे