आपला जिल्हा

उष्णतेमुळे जिल्ह्यातील शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

उष्णतेमुळे जिल्ह्यातील शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

उष्णतेमुळे जिल्ह्यातील शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जाहिरात

Ahilyanagar vijay kapse दि १७ एप्रिल २०२६: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दि. १८ एप्रिल २०२६ पासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

जाहिरात

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश देण्यात आला असून, शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक राहील.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे