आपला जिल्हा

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई परीक्षेत १०० टक्के निकाल

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई परीक्षेत १०० टक्के निकाल


                    स्वरीत भळगाटीया ९७.२० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १८ एप्रिल २०२६ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा इ. १० वीच्या  सीबीएसई परीक्षेत १०० टक्के निकाल लागला असुन यात स्वरीत भूषण  भळगाटीयानेे  ९७.२०  टक्के गुण मिळवुन शाळेत  प्रथम क्रमांक मिळविला. तसेच त्याने  सोशल सायन्स विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन आपल्या बुध्दीची चुणुक दाखविली. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये या परीक्षा घेतल्या होत्या. संजीवनी इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच इतर सर्व क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात

या परीक्षेमध्ये साची विरेश  अग्रवाल हीने ९६ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या  क्रमांकावर आपली मोहर उमटवली. तीने इंग्रजी व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले. जुई अजित पाटील हीने ९४.४० टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला.दर्श  पवन भुतडा व पृथ्वीराज माळवदे यांनी अनुक्रमे ९४ व ९३.६० टक्के गुण मिळवुन चौथा व पाचव्या क्रमांकावर आपले शिक्कामोर्तब केले. दर्श  भुतडा याने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सिध्द केले.

जाहिरात

   केवळ गुणपत्रिकेवरील गुण आजच्या स्पर्धात्मक युगात पुरेसे ठरत नाहीत तर यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्ये, सकारात्मक मूल्ये आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास अत्यावश्यक ठरतो. याच दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी शाळेत विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. परिणामी, शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर नाही, तर इतर क्षेत्रांतही विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल करीत आहेत, हीच शाळेची खरी आणि अभिमानास्पद उपलब्धी आहे.
     विद्यार्थ्यांच्या या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे भाग्यवंत पालक यांचे अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे , डायरेक्टर ऑफ स्कूल ऑडीट सुंदरी सुब्रमण्यम व प्राचार्या शैला  झुंजारराव यांचे मार्गदर्शन  लाभले.

संजीवनी स्कूल

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे