आपला जिल्हा

एन.एम.एम.एस परीक्षेत आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल

एन.एम.एम.एस परीक्षेत आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल

एन.एम.एम.एस परीक्षेत आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ एप्रिल २०२६:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करत राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान प्राप्त केले. या शाळेने अकराव्या वेळेस अशी अव्वल कामगिरी केली आहे. यंदा या शाळेचे 92 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.

जाहिरात

त्यांना प्रत्येकी दरमहा 1000 रुपये प्रमाणे चार वर्षासाठी 48000 रूपयांप्रमाणे एकूण 44 लाख 16 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती गुरूकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, या वर्षी सदर परीक्षेचे मिरिट हे आजपर्यंतचे सर्वोच्च असतांनाही आत्मा मालिकेची कामगिरी लक्षवेधी ठरली. या परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुलाचे आजपर्यंत 1772 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून त्यांनी 8 कोटी 50 लाख 56 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.

.आत्मा मालिक पॅटर्न चे हे यश असून त्या अंतर्गत जादा तयारी वर्ग, विशेष तयारी वर्ग, सुपर नाईट अभ्यासिका, सुवर्ण पहाट अभ्यासिका, स्मार्ट सण्डे उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दिर्घ सुट्यांमध्ये विशेष तयारी शिबिरे, दैनिक सराव परीक्षा, विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन वर्ग, विद्यार्थी दत्तक योजना या सारख्या गुणवत्ता वर्धक उपक्रमांमुळे आज सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रवेश परीक्षा यामध्ये आत्मा मालिक अव्वल स्थानी आहे.

नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष विश्वात्मक, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे