आपला जिल्हा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चिंचोली गुरव मध्ये सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चिंचोली गुरव मध्ये सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू

थोरात सह.साखर कारखान्याच्या पुढाकाराने पाईप टाकण्याचे काम सुरू

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २५ एप्रिल २०२६- अहिल्या नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरता त्यांनी पूर्ण नियोजन केले होते मात्र सध्याचे सरकार उदासीन असल्याने आपल्या शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पाणी नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जाहिरात

चिंचोली गुरव येथील जाते खाणी बंधारा ते शिवाचा मळा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक संपतराव गोडगे, सरपंच विलास सोनवणे, विलास मास्तर सोनवणे,संदेश गोडगे, विजय गोडगे, डॉ.सुहास आभाळे, लक्ष्मण सोनवणे, प्रताप गोडगे, सतीश गोडगे, बबन गोडगे,भास्करराव पानसरे,राजेंद्र गोडगे,विनोद गोडगे, हरि वाघ, भाऊसाहेब गोडगे,वैभव आभाळे,रवि वाणी,भाऊसाहेब वाणी, अनिल गोडगे,विनोद गोडगे आदींसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

निळवंडे डाव्या कालव्यातून चिंचोली गुरव मध्ये कारखान्याच्या माध्यमातून पाणी आले असून जाते खाणी बांधारा ते शिवाचा मळा या दोन किलोमीटर लांबीच्या अंतरावर सिमेंट पाईप टाकण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी धरण व कालवे पूर्ण केले. मात्र पाणी वाटपाच्या वेळेस दुर्दैवाने ते नाही तरीही सर्व भागाला पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कारखान्याच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांना सिमेंट नळ्या दिल्या आहेत त्यामुळे नालाबर्डी बंधाऱ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. सध्याचे सत्ताधारी ज्यांना हा परिसर माहिती नाही ज्यांना शेतकऱ्यांचे काही देणे – घेणे नाही ते फक्त फोटोसाठी येत आहेत. काम आपल्यालाच करायचे आहे. शेतकरी राजा हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यात पाठीशी आहे. आणि या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात हेच पाणी देणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कारखाना सातत्याने मदत करेल असे ते म्हणाले.

जाहिरात

तर संपतराव गोडगे म्हणाले की, थोरात कारखान्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये विविध गावांना पाणी देण्याचे काम केले आहे. देवकवठे येथेही कारखान्याने सिमेंट पाईप देऊन पाणी पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांसह मोठी मदत केली आहे. चिंचोली गावच्या काही भागाला यामुळे पाणी मिळाले आहे सर्व भागाला पाणी देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

तर सरपंच विलास सोनवणे म्हणाले की, महायुतीचे सर्व या भागातील पुढारी फक्त फोटो वाले आहेत त्यांना पाण्याची देणे घेणे नाही. सोशल मीडियावर स्वतःची प्रसिद्धी करणारे कधीही काम करत नाहीत. पंधरा मिनिट सुद्धा कामावर न थांबणारे मंडळी श्रेय घेण्यासाठी पुढे येतील असा टोला त्यांनी लगावला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मास्तर सोनवणे यांनी केले तर विजय गोडगे यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे