संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पिक विम्यात मोठा अन्याय; तालुक्यातील शेतकऱ्यांना ठेवले जाणीवपूर्वक वंचित

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पिक विम्यात मोठा अन्याय; तालुक्यातील शेतकऱ्यांना ठेवले जाणीवपूर्वक वंचित
प्रथमच तालुक्याला 0 टक्के पिकविमा हे दुर्दैवाचे

Sangmner vijay kapse दि ८ मे २०२६-लोकनेते तथा महा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम पीकविमा सह विविध मदती मिळाल्या. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे इतिहासात प्रथमच 0 टक्के पिक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी घोर निराशा झाली असून आर्थिक नुकसान झाले असून हा विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांशी खेळलेला डाव आहे अशी टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे.

शेतकरी पिक विमा बाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आनंद वर्पे, व तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी म्हटले आहे की , संगमनेर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा आहे तालुक्यामध्ये पठार भाग, प्रवरा भाग आणि तळेगाव पट्टा असे तीन भौगोलिक भाग येतात. विस्ताराने मोठा असूनही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कायम मदत मिळत राहिली.
याला तालुक्यातील सर्व शेतकरी जामीन आहेत मात्र मागील दीड वर्षापासून बदललेल्या राजकारणामुळे तालुक्यातील विकास कामांवर कायम अन्याय होत असून मिळणाऱ्या मदतीमध्ये ही संगमनेर तालुक्याला जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवले जातात.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 118 कोटींचा पिक विमा मंजूर झाला यामध्ये राहता तालुक्याला १३ कोटी कोपरगाव तालुक्याला नऊ कोटी अकोले तालुक्याला एक कोटी श्रीरामपूर तालुक्याला 17 कोटी राहुरी तालुक्याला सहा कोटी अशी रक्कम मिळाली मात्र संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची वाट लावताना या सरकारने 1 रुपयाही पीक विमा दिला नाही.
सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी व पालकमंत्री फक्त जाहिरात बाजी आणि विकास कामांची सोशल मीडियातून प्रसिद्धी करत आहे. मात्र कोणत्याही गावांमध्ये कुठेही कोणतेही विकासकाम सुरू नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. धार्मिकतेच्या आणि जातीभेदाच्या नावावर राजकारण सुरू असून हे अत्यंत दुर्दैवाचे आहे.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. अशावेळी नवीन लोकप्रतिनिधीने काकडवाडी सारख्या ठिकाणी टँकर पाठवून फक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आणि टँकर बंद केले. याउलट राजहंस दूध संघाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहतानी पठार भागातील वाड्यावर पाणी पुरवले.
या सगळ्या परिस्थितीमध्ये संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर सातत्याने जाणीवपूर्वक मोठा अन्याय केला जात असून पिक विमा मध्ये 0 मदत मिळाली आहे.
ही शेतकऱ्यांची केलेली क्रूर थट्टा असून यापुढील काळात तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.
टक्केवारी वाढली मात्र शेतकऱ्यांची वाट लावली
सध्या संगमनेर तालुक्यातील विकास कामांमध्ये टक्केवारीची मोठी चर्चा आहे. तालुक्यात टक्केवारी वाढली आहे मात्र शेतकऱ्यांची मोठी वाट लावली असल्याची घाणाघाती टीका ज्येष्ठ शेतकरी पांडुरंग गुंजाळ यांनी केली आहे


