आत्मा मालिक गुरुकुलाचा अश्विन कुमकर दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम तर १०० टक्के निकालाची परंपरा कायम

आत्मा मालिक गुरुकुलाचा अश्विन कुमकर दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम तर १०० टक्के निकालाची परंपरा कायम
आत्मा मालिक गुरुकुलाचा अश्विन कुमकर दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम तर १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Yeola vijay kapse दि १० मे २०२६– येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलाचा अश्विन कुमकर या विद्यार्थ्यांने मार्च २०२६ मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन गुरुकुलाने नवीन यशाला गवसणी घालत पुन्हा एकदा आपले स्थान बळकट केले आहे.अश्विन याला इंग्रजी ९५, हिंदी ९५, मराठी ९०, गणित ९७, विज्ञान व तंत्रज्ञान ९४, सामाजिक शास्त्रे ९८ असे एकूण ५०० पैकी ४८६ गुण मिळाले आहेत. तो गुरुकुलातील शिक्षिका मनीषा रवींद्र कुमकर यांचा सुपुत्र असून त्याचे वडील रवींद्र कुमकर हे जिल्हा परिषद शिक्षक आहेत.

मार्च २०२६ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुरुकुलाचे एकूण २५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ०३ विद्यार्थी ९०.००% पेक्षा जास्त तर तब्बल १३ विद्यार्थी हे ८०.००% पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. तर विशेष म्हणजे, गुरुकुलाच्या सृष्टी घोडके हिने गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशामुळे गुरुकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

गुरुकुलचे या परीक्षेत विशेष प्रविण्यासह अश्विन रवींद्र कुमकर – ९७.२०%, सृष्टी स्वप्नील घोडके – ९४.८०%, मयुरी ज्ञानेश्वर मगर – ९०.८०%, सुयश शिवाजी भोरकडे – ८९.००%, जयेश महेश निकुंभ – ८८.४०%, संस्कृती अनिरुद्ध शिंदे – ८८.००%, राधिका चंद्रकांत परदेशी – ८७.४०%, स्पंदन अमोल लहरे – ८४.८०%, समृद्धी रोशन गुप्ता – ८४.००%, साई सुधाकर कुऱ्हाडे – ८२.६०%हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

प.पु सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपशिर्वादाने दहावी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना येवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतरावजी भोंगळे साहेब,उपाध्यक्ष हेमंत शहा,येवला संतपिठाचे संत कंकाली महाराज, यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराजव संतपीठ यांनी सदगरू माउलींच्या समोर अभिनंदन केले आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला ही सदगुरु आत्मा मालिक माऊलींची तपोभूमी असून या ठिकाणी ही दहावीची तिसरी बॅच असून सर्व विद्यार्थी पास होऊन १००% निकालाची उज्वल परंपरा लाभली आहे तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी आहे,गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी मनीषा वाकचौरे व नंदा सोळुंके, केंद्रप्रमुख चंद्रशेखर दंडगव्हाळ यांचा सह सर्व विश्वस्त,प्राचार्य तुषार कापसे, शिक्षकवृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



