गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा १००% निकाल

गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा १००% निकाल
गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा १००% निकाल

Kopargaon vijay kapse दि १० मे २०२६– श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरसगाव शाळेचा विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन करत १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील सर्व ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.

यावर्षीच्या निकालात तेजस अमोल घाटे याने ९४.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच रुतुजा गणेश गायकवाड हिने ९३.४०% गुणांसह द्वितीय तर कृष्णा जालिंदर काळे याने ९३.००% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.तसेच अनुजा बाबासाहेब नवले ९१.८०% गुण , पार्थ अनिलराव सिनगर ९०.८०%, स्नेहल किरण हेगडमल ९०% , ईश्वरी अरुण कदम ८९.८०% , ऋतुजा राजेंद्र मगर ८९.८०% ,प्रतीक्षा किशोर लोखंडे ८९.६०%,मानसी दत्तात्रय मलिक ८९.४०% , अनुष्का सुहास भोकरे ८९% , पल्लवी संतोष साबळे ८९% तर विद्यालयाचे ९० % पेक्षा जास्त गुण मिळवणारे ७ विद्यार्थी, तर ८० ते ९०% मध्ये एकूण २७ विद्यार्थी ,७० ते ८०% मध्ये २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले असून ६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर ,संचालक स्वप्निल भवर, मुख्याध्यापक दीपक चौधरी यांच्या सह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या यशामुळे शिरसगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.





