कोपरगावात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स; बना एका वर्षात शासकीय ठेकेदार
कोपरगावात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स; बना एका वर्षात शासकीय ठेकेदार
कोपरगावात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स; बना एका वर्षात शासकीय ठेकेदार
Kopargaon vijay kapse दि १२ मे २०२६– आजच्या धावपळीच्या व महागाईच्या जगात कितीही उच्च शिक्षण घेतले तरी लगेचच नोकरी मिळेल याची शाश्वती उरली नसताना आपल्या कोपरगावात अवघ्या एक वर्षात महाराष्ट्र शासन मान्य १ वर्ष कालावधीचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजेच बांधकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रम पूर्ण करत स्वतःचा बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय सुरू करता येतो तसेच मोठ्या निमशासकीय व शासकीय नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहे.

सविस्तर वृत्त असे की, आपल्या कोपरगाव मध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेत इयत्ता १० ची परीक्षा उत्तीर्ण नंतर अवघा १ वर्ष कालावधीचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक/स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) हा कोर्स मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी इयत्ता १० वी अथवा त्या पुढील वर्ग उत्तीर्ण शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, इयत्ता १० वी अथवा त्या पुढील वर्ग उत्तीर्ण गुणपत्रक, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट फोटो तरी गरजु विद्यार्थ्यांनी त्वरित प्राचार्य बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था, महात्मा गांधी प्रदर्शन,खंडोबा मंदिर समोर, कोपरगाव,जिल्हा अहिल्यानगर येथे संपर्क साधावा अथवा अधिक माहितीसाठी ९८२३७६२०८७, ९३०७६१९५४५, ८८०५७४९१५७, ९९२३३२३५३५ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

सदर अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर स्वतःचा शासकीय अथवा खाजगी बांधकाम ठेकेदारीचा (कॉन्ट्रॅक्टर) व्यवसाय सुरू करता येतोच परंतु निमशासकीय व शासकीय विभागात देखील मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी हा कोर्स उत्तीर्ण झाल्या नंतर उपलब्ध आहे. या कोर्से प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारे वयाची अट नाही त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुकांनी आजच आपला प्रवेश निश्चित करत कमी कालावधीत शासकीय बांधकाम ठेकेदार होण्यास पात्र व्हावे असे अवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे यांनी केले आहे.



