आपला जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ मे २०२६मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची आष्टी येथील तपासणी पथकाने नुकतीच तपासणी केली असल्याची माहिती कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांनी दिली आहे.

जाहिरात

प्रत्येक गाव समृद्ध झाले तर राज्य समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवले जात असून या अंतर्गत तालुक्यातील ब्राह्मणगाव, चांदेकसारे, चासनळी, धामोरी, धोत्रे, डाऊच बु,करंजी बु,कोळपेवाडी, कुंभारी, माहेगाव देशमुख, पोहेगाव, रवंदे, सडे, सांगवी भुसार, संवत्सर, शहाजापूर, सोनेवाडी, टाकळी, वारी, येसगाव या २१ ग्रामपंचायतीची तपासणी आष्टीचे गटविकास अधिकारी श्री बागलाण, विस्तार अधिकारी श्री जायभाय, श्री बहिर, डाटा एन्ट्री ऑपरेटर किरण खिल्लारे, अभियंता मुकुल, चालक श्री शेख आदींच्या पथकाने करत गावातील ग्रामपंचायत अभिलेखे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याची सोय आधी ठिकाणांची पाहणी केली.

जाहिरात

या पथकाने तालुक्यातील करंजी बु या गावात भेट दिली असता गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, पाण्याची सोय, गावचा परिसर बघत समाधान व्यक्त केले. या पथकासोबत कोपरगाव तालुका विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे उपस्थित होते तर गावचे सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे, ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात आदी उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे