आपला जिल्हा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. नारायण खेमनर यांना पीएच.डी. ‎प्रदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. नारायण खेमनर यांना पीएच.डी. ‎प्रदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. नारायण खेमनर यांना पीएच.डी. ‎प्रदान

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १३ मे २०२६-: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी “Experimental ‎Investigation into Dissimilar Metal Lap Joining Using Friction Stir Scribe Technique” या ‎विषयावर संशोधन पूर्ण केल्याबद्दल डॉ. प्रा. नारायण सहादू खेमनर यांना पीएच.डी. पदवी ‎प्रदान केली. हे संशोधन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ‎अहिल्यानगर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील संशोधन केंद्रात करण्यात आले ‎असून, या संशोधनासाठी त्यांना डॉ. विजय गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.‎

जाहिरात

डॉ. प्रा. नारायण खेमनर हे संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावचे माजी सरपंच  सहादू खेमनर यांचे सुपुत्र ‎असून ते सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संगमनेर येथे कार्यरत आहेत. ‎त्यांच्या संशोधनामुळे ऑटोमोबाईल उद्योगामध्ये धातूंच्या जोडणीच्या आधुनिक तंत्रज्ञानाला ‎चालना मिळून वाहनांचे वजन कमी करण्यास तसेच मायलेज वाढविण्यास मोठी मदत होणार ‎आहे.‎

जाहिरात

या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी २ एससीआय दर्जाचे जर्नल पेपर्स, २ आंतरराष्ट्रीय ‎परिषदेतील संशोधन पेपर्स सादर केली आहेत.‎ त्यांच्या या यशाबद्दल  बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ( अध्यक्ष, अमृतवाहिनी ‎शेती व शिक्षण विकास संस्था व माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन ), मा. आ. सुधीर तांबे ,  आ. सत्यजित तांबे ,  रणजितसिंह देशमुख , चेअरमन, राजहंस दूध संघ , विश्वस्त ‎ शरयू देशमुख ,  ए. बी. ‎शिंदे ( मुख्य कार्यकारी अधिकारी ) अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था , प्रा. व्ही. बी. धुमाळ , मॅनेजर , डॉ. प्रा. जे. बी. गुरव ‎‎( संचालक, अकॅडेमिक्स ), तसेच प्राचार्य ‎ डॉ. एम. ए. वेंकटेश , अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , प्रा. व्ही. पी. वाघे , रजिस्ट्रार तसेच डॉ. प्रा. आर. आर. नवथर ( प्राचार्य, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहिल्यानगर ), डॉ. प्रा. एस. एम. मगर ( विभागप्रमुख ), डॉ. प्रा. के. एम. मरकड ( समन्वयक ) व त्यांचे सर्व मित्र परिवार , यांनी त्यांचे अभिनंदन ‎केले आहे.‎

जाहिरात

पीएच.डी. पदवी मिळाल्यामुळे खेमनर यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाची ‎दखल घेतली जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत ‎आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे