मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धोत्रे ग्रामपंचायतीची तपासणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धोत्रे ग्रामपंचायतीची तपासणी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धोत्रे ग्रामपंचायतीची तपासणी

Kopargaon vijay kapse दि १३ मे २०२६– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची आष्टी येथील तपासणी पथकाने नुकतीच तपासणी केली असल्याची माहिती कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांनी दिली आहे.

प्रत्येक गाव समृद्ध झाले तर राज्य समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवले जात असून या अंतर्गत तालुक्यातील ब्राह्मणगाव, चांदेकसारे, चासनळी, धामोरी, धोत्रे, डाऊच बु,करंजी बु,कोळपेवाडी, कुंभारी, माहेगाव देशमुख, पोहेगाव, रवंदे, सडे, सांगवी भुसार, संवत्सर, शहाजापूर, सोनेवाडी, टाकळी, वारी, येसगाव या २१ ग्रामपंचायतीची तपासणी आष्टीचे गटविकास अधिकारी श्री बागलाण, विस्तार अधिकारी श्री जायभाय, श्री बहिर, डाटा एन्ट्री ऑपरेटर किरण खिल्लारे, अभियंता मुकुल, चालक श्री शेख आदींच्या पथकाने करत गावातील ग्रामपंचायत अभिलेखे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याची सोय आधी ठिकाणांची पाहणी केली.

या पथकाने तालुक्यातील धोत्रे या गावात भेट दिली असता गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, पाण्याची सोय, गावचा परिसर बघत समाधान व्यक्त केले. या पथकासोबत कोपरगाव गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे उपस्थित होते तर धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण उपसरपंच शितल नामदेव चव्हाण , ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, ग्रामपंचायत सदस्य भगवान चव्हाण,भाऊसाहेब गागरे, कैलास चव्हाण, विमलताई खाबीया, राजेंद्र जामदार, विजय जामदार, सुरेश जाधव (व्हा.चेअरमन संजिवनी बॅक), गजानन शिंदे, मच्छिंद्र चव्हाण, आधोडे सर, किरण चव्हाण, मनोज पाडेकर,प्रविण चव्हाण (अध्यक्ष शिवबा प्रतिष्ठान), प्रविण जामदार,जयवंत शिंदे, करडे सर, देशमुख सर, जी.प.शाळा मुख्याध्यापक, वीरभद्र विद्यालय शिक्षक वृंद , देवकर सर, भाटे सर, रखमा जानराव, दारकु जानराव, संतोष जानराव, बिच्चु नाना आदी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.






