आपला जिल्हा

मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून तिगाव येथील सानप कुटुंबीयांचे सांत्वन

मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून तिगाव येथील सानप कुटुंबीयांचे सांत्वन

सख्ख्या दोन भावांच्या मृत्यूने तालुका हळहळला

जाहिरात

Samgmner vijay kapse दि २३ मे २०२६तिगाव येथील दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या महेश गोरखनाथ सानप व ओंकार गोरखनाथ सानप यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ निर्माण झाली असून सानप कुटुंबीयांचे महाराष्ट्राचे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तिगाव येथे जाऊन सांत्वन केले त्याचबरोबर या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळून देण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या.

जाहिरात

मयत महेश व ओमकार सानप यांच्या मातोश्री मनीषा सानप व कुटुंबीयांची माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तिगाव येथे जाऊन भेट घेत सांत्वन केले .यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सानप, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, डॉ संदीप गोरडे, अनिल कांदळकर, वाल्मीक सानप, छबुराव सानप, नामदेव सानप, प्रभाकर कांदळकर, प्रकाश सानप, संजय सानप, योगेश सानप, विशाल सानप आदींसह गावातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

शुक्रवारी दुपारी तिगाव येथील दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या महेश गोरखनाथ सानप (वय 18) व ओमकार गोरखनाथ सानप (वय 14) या दोन भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मागील एक वर्षांपूर्वी या मुलांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते. शुक्रवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त झाली .

जाहिरात

या घटनेची माहिती कळताच महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले कार्यकर्ते व प्रशासनाला संबंधिताला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या याचबरोबर मुंबईहून परतल्यानंतर आज स्वतः तिगाव येथे जात मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून. या घटनेमुळे दोन निष्पाप जीवांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी वडिलांचा मृत्यू आणि आता दोन तरुण मुलांचा मृत्यू होणे हे अत्यंत दुःखदायी घटना आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असून अशा घटना होऊ नये अशी काळजी सर्वांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

यानंतर त्यांनी तातडीने कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून संबंधित कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. याचबरोबर सानप कुटुंबीयांना धीर देत सर्व गावातील नागरिक नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी कायम उभे राहावे असे आवाहन केले. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे तीगाव व परिसरात मोठी हळहळ पसरली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे