शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रवीण जोगदंड यांचा ‘कलाकार ‘ठरला चर्चेचा विषय

शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रवीण जोगदंड यांचा ‘कलाकार ‘ठरला चर्चेचा विषय
शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रवीण जोगदंड यांचा ‘कलाकार ‘ठरला चर्चेचा विषय

Kopargaon vijay kapse दि २८ मे २०२६– साई पालखी फिल्म्स व आरजी-७ स्टुडिओज प्रस्तुत साईनगरीत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय लघुपट स्क्रीनिंग आणि भव्य पारितोषिक वितरण सोहळा २४ मे रोजी नाईन कॉइन हॉटेल मध्ये मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील तब्बल ५२ पेक्षा अधिक चित्रपटांनी हजेरी लावली होती हे सर्व प्रोजेक्ट दर्जेदार होते. स्क्रीनिंग चालू असताना छाप पाडली ती कलाकाराचे जीवनावर आधारित पुणतांबा येथिल उभारता कलाकार प्रवीण जोगदंड यांच्या ९ मिनिटांच्या व्हिडिओने आणि त्यातील संवादाने संपूर्ण प्रेक्षक वर्ग आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

प्रसिध्द रिल स्टार प्रवीण जोगदंड याने अनोख्या रित्या सादर केलेल्या कलेबद्दल त्यास या सोहळ्यात ‘जुरी स्पेशल अवॉर्ड ‘कलाकार म्हणून प्रसिद्ध अभिनेते व कॉमेडी किंग किशोर अग्रवाल यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहत सर्व कलाकारांचे अभिनंदन केले. तर रंगभूमीतील मोठमोठे कलाकार ,दिग्दर्शक, निर्माते ,लेखक आणि संगीतकार, लघुपट निर्माते आदी सिनेसृष्टीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवीणने मांडलेला सामाजिक जीवनावरील विषय हा नजरेत भरणारा व काळजाला भिडणारा असल्यामुळे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यातील बऱ्याच दिग्गजांनी तसेच दिग्दर्शकांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांच्याशी हात मिळून कौतुकही केले मिळालेल्या अवॉर्डने प्रवीण समाधानी असून त्यांनी फेस्टिवल आयोजक मधुकर कर्डक आणि रंगराव घागरे तसेच सागर पतंगे यांचे आभार मानले

कारण यामुळे ग्रामीण भागातील तरुण कलाकारांसाठी हक्काचे स्टेज मिळणार आहे.त्याला या मिळालेल्या यशाबद्दल ॲड. राहुल शेळके, प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ धनंजय धनवटे, अनिल नळे, प्रताप वहाडणे, बाळासाहेब भोरकडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी ,अमोल सराळकर, गणेश बनकर ,अशोक धनवटे, चंदू वाटेकर आदी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



