मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी तळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा
मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी तळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा
मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी तळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा

Sangmner vijay kapse दि २८ मे २०२६– संपूर्ण देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वा. महाराजा लॉन्स येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये ऊस विकास मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

थोरात कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढ व्हावी याकरता मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जोर्वे,खांडगाव व साकुर येथे ऊस विकास मेळावा संपन्न झाला आहे. तळेगाव व निमोन परिसरातील शेतकऱ्यांसाठी शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता महाराजा लॉन्स येथे या ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी व कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.

यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक कडलग व डॉ. समाधान सुरवसे हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या ऊस विकास मेळावा कार्यक्रमासाठी तळेगाव व निमोन परिसरातील सर्व शेतकरी सभासद ऊस उत्पादक युवक महिला कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सर्व संचालक मंडळ व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




