एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएट पदासाठी निवड

एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएट पदासाठी निवड
एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएट पदासाठी निवड

Kopargaon vijay kapse दि ३० मे २०२६: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथील रसायनशास्त्र विभाग, प्लेसमेंट सेल आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात किनोमेरा बायोसायन्सेस प्रा. लि., मुंबई या नामांकित कंपनीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमधून पदव्युत्तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या वैभव काजळे, बबन पावळे, गणेश भोसले, अमित मापारी, राहुल आहेर आणि प्रशांत निकम या विद्यार्थ्यांची रिसर्च असोसिएट पदासाठी निवड करण्यात आली.

कंपनीच्या वतीने डॉ. ज्ञानेश्वर पाचरणे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. संदीप वर्पे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, चैताली काळे, आमदार विवेक कोल्हे, सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिलीप भोये,रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रतिभा रांधवणे, डॉ. विलास गाडे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




