आपला जिल्हा

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे -माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे -माजी मंत्री बाळासाहेब थोरात

तळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा संपन्न

एकरी १०० टन ऊस उत्पादित करा

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ३० मे २०२६चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेतून निळवंडे धरण सुरू झाले या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही धरण आणि दोन्ही कालवे आपण पूर्ण केले. आता पाणी आले आहे. उर्वरित भागालाही पाणी द्यायचे आहे. मात्र कॉंक्रिटीकरण करून पाणी पुढे नेले जात असून संगमनेर तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

जाहिरात

तळेगाव दिघे येथील महाराजा लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ अशोक जगताप, डॉ समाधान सुरवसे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे ,प्रभाकर कांदळकर, संचालक संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, बी आर चकोर, भारत मुंगसे, बाबासाहेब कांदळकर, संचालक रामनाथ कुटे, योगेश भालेराव, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, मदन आंबरे, डॉ तुषार दिघे, विलास शिंदे, दिलीप नागरे, नामदेव दादा दिघे, सौ लताताई बाबासाहेब गायकर, सौ सुंदराबाई रावसाहेब दुबे, विष्णू ढोले, साहेबराव गडाख, किसनराव सुपेकर, अनिल घुगे, संजय पोकळे ,किसन दिघे, जना कासार, त्रिंबक गायकवाड, सरपंच विलास सोनवणे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, संभाजीराव वाकचौरे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना मा मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, म्हाळादेवी धरण झाले असते तर पाण्याची लेव्हल वर आली नसती. आणि नदीच्या कडेलाच पाण्याचा फायदा झाला असता. मात्र चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि निळवंडे धरणासाठी आपण पाठपुरावा सुरू केला. एक दिवसही विश्रांती न घेता धरण आणि कालवे पूर्ण दिले. ज्यांनी अडचणी निर्माण केल्या त्यात श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.  कालव्याला अस्तरीकरण केले जात असून पाणी पुढे नेले जात आहे. ते ही शेतकरी आमचेच आहे मात्र संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे.

जाहिरात

पाणी विज या राजकारणापलीकडच्या गोष्टी आहेत. याबाबत नवीन लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाही. हे दुर्दैवी आहे त्यांचे लक्ष दुसरीकडेच आहे. निमोण, नान्नज दुमाला ,पारेगाव खुर्द ,पारेगाव बुद्रुक ,तळेगाव ,सोनोशी , काकडवाडी, पिंपळे,करुले या गावांसाठी उपसा सिंचन योजना आपण मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र नव्या सत्ताधाऱ्यांनी या योजना रद्द केल्या आहेत. भोजापूर चारी आपण पूर्ण केली. पाणी आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. भोजपूर चारीवरून ज्यांनी या भागात विष कालविण्याचा प्रयत्न केला ते आता पाणी प्रश्नावर गप्प आहे. त्यांना आता सर्वांनी जाब विचारला पाहिजे.

निळवंडे चे पाणी पुढे नेले जात आहे .वीज मिळत नाही. पिक विमा मिळत नाही अशावेळी नवीन लोकप्रतिनिधी मात्र पूर्ण गप्प आहे. म्हणून आपल्याला सर्वांना जागृत व्हावे लागेल मतभेद विसरून पाण्यासाठी एकत्र या.

निळवंडे धरण व कालव्यांप्रमाणे काकडी विमानतळ आपण पूर्ण केले. रेल्वे मंजूर करून घेतली .तालुक्यात रेल्वे करता 560 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी जी एम आर टी चे कोणतेही कारण  नव्हते .आपण सत्तेत नाही आणि आता हे कारण पुढे काढून रेल्वे पळवण्याचा घाट घातला जात आहे. संगमनेर तालुक्याचा विकास ज्यांना पहावत नाही त्यांनी रेल्वे बाबत राजकारण केले आहे.

याचबरोबर यावर्षी कमी पाऊस असल्याबाबत चिंता व्यक्त करताना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. ते पाणी जपून वापरावे. तसेच दूध व ऊस हे शाश्वत पिक आहे .या भागात जास्तीत जास्त ऊस लागवड करताना शेतकऱ्यांनी एकरी शंभर एकर उत्पादन घ्यावे असे आवाहन केले. याचबरोबर चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग या भागातून जात असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा याकरता आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असून त्यांनीही शेतकऱ्यांना मदतीबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे माजी मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे

जाहिरात

डॉ. अशोक जगताप म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा केला तेथील संशोधन आणि नवीन प्रणालींचा महाराष्ट्रात नक्की उपयोग होईल असे म्हणाले तर डॉ. समाधान सुरवसे म्हणाले की शेतीचे आरोग्य चांगले राहिले तर ऊस उत्पादन चांगले येईल माती परीक्षण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले यावेळी किसन दिघे यांनी चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाच्या मागण्यांबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली. यावेळी सेक्रेटरी किरण कानवडे कृष्णाजी कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे, डॉ संदीप गोरडे, यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेगाव पाणीपुरवठा योजनेचे काम आपण केले

2000 मध्ये तळेगाव सह 16 गावांना पाणी मिळावे याकरता ही योजना सुरू केली. अनेक अडचणी आल्या मात्र कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने सोडावून जनतेला पाणी दिले. 2019 मध्ये या योजने करता नव्याने 81 कोटी रुपये मंजूर केले. तालुक्यातील विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनेसाठी 780 कोटी रुपये निधी मंजूर केला. मागील दीड वर्षापासून तळेगाव योजना बंद होती. कॉन्ट्रॅक्टरला महायुतीच्या व सत्ताधाऱ्यांचा कार्यकर्ता अडून पाहत होता. शेवटी त्याच्याशी संवाद साधून आपण प्रश्न मार्गी लावला. वडगाव पान तळ्यात पाणी आले आता प्रत्येक गावात पाणी पोहोचले आहे. हे पाणी आपल्यामुळे आले आहे. ज्यांचे काही योगदान नाही ते श्रेय घेण्यासाठी येत आहे .त्यांनी नवीन योजना नव्या काम करावी आणि खुशाल श्रेय घ्यावे असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता  लगावला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे