आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय आय. टी. कंपन्यांमध्ये मध्ये निवड

सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय आय. टी. कंपन्यांमध्ये मध्ये निवड

सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय आय. टी. कंपन्यांमध्ये मध्ये निवड

Kopargaon vijay kapse दि १४ जुन २०२६- के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.

जाहिरात

पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की महाविद्यालयातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. यामध्ये इन्फोसिस मध्ये आभाळे वैभव, काँगनिझंट  मध्ये भोगडे शरद, टी .सी.एस. मध्ये कदम ऋषिकेश आणि ठोंबरे आकाश, कॉन्सेंट्रिक मध्ये भिंगारे विकास, विप्रो मध्ये सुवर्णा रहाणे, आप्पे स्टेक मध्ये पऱ्हे संकेत व ॲक्सिस बँकेत ऋषिकेश रहाणे या विद्यार्थ्यांची निवड झाली. महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यावर्षी विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असल्याचे सांगितले.

जाहिरात

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ. रवींद्र जाधव यांनी सांगितले की, महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल च्या वतीने या वर्षी चार कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले व एकूण 18 कंपन्यांनी महाविद्यालयात भेट देऊन मुलांची निवड केली आहे. विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्यासाठी महाविद्यालयाने या वर्षी अनेक ट्रेनिंग प्रोग्राम चे आयोजन केले यामध्ये बजाज फिनसर्व चा बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्स कोर्स, रिलायन्स फाउंडेशन चा एम्पलाबिलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, महिंद्रा अँड महिंद्रा नांदी फाउंडेशन चा सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, सोमैया गोदावरी केमिकल  रिफायनरी चा ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम, टेक्नो ग्रोथ कंपनीचा इंटर्नशिप प्रोग्राम इत्यादी प्रोग्राम महाविद्यालय राबविण्यात आलेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनलिटी डेव्हलपमेंट साठी स्वतंत्र ट्रेनर ची नेमणूक केली असल्याचे सांगितले.

जाहिरात

या प्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या करियर साठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी आय. क्यू. ए.सी. समन्वयक प्रा.डॉ.गणेश शिंदे, रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे, ट्रेनिंग ऑफिसर प्रा. विजय सोमासे, डॉ. शैलेंद्र बनसोडे, प्रा.सचिन जाधव, प्रा. मयुरी आवारे, प्रा. ओमप्रकाश धनवटे आणि प्रा. जयश्री कदम उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे