आपला जिल्हा

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १७ जुन २०२६स्वराज्याच्या शिल्पकार तथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

जाहिरात

यावेळी नगरसेविका गटनेत्या सौ.गौरी पहाडे, सौ. निर्मला आढाव, माजी नगरसेविका सौ. मायादेवी खरे, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, इम्तियाज अत्तार, शैलेश साबळे, संदिप कपिले, बाळासाहेब रुईकर, मंदार पहाडे, सोमेश आढाव, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक प्रदीप कुऱ्हाडे, माजी नगरसेवक रमेश गवळी, बाळासाहेब आढाव, दिनकर खरे, अशोक आव्हाटे, सचिन परदेशी, मनोज नरोडे, मुकुंद भूतडा, जावेद शेख, धनंजय कहार, ठकाजी लासुरे, विकास बेंद्रे, राजेंद्र खैरनार, राजेंद्र उशिरे, राजेंद्र बोरावके, योगेश वाणी, शिवाजी लकारे, सिद्धार्थ शेळके, मयुरेश शिंदे, रविंद्र राऊत, वैभव कानडे, प्रशांत मोरे, उमेश दिक्षित आदींसह नागरिक उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे