वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार; प्रत्यक्ष उपस्थित नसणार – बिपीनदादा कोल्हे
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार; प्रत्यक्ष उपस्थित नसणार – बिपीनदादा कोल्हे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १७ जुन २०२६ : दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून मिळणारे प्रेम, स्नेह आणि शुभेच्छा ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि ऊर्जा ठरते. मात्र काही अनिवार्य कारणांमुळे यंदा वाढदिवसाच्या दिवशी मला कोपरगाव येथे उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली आहे.
जाहिरात
गेल्या अनेक वर्षांपासून माझा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा अविस्मरणीय दिवस बनला आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गरजूंना मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिक व कार्यकर्ते हा दिवस साजरा करतात, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंद देणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.जाहिरात
हार, पुष्पगुच्छ किंवा औपचारिक सत्कार स्वीकारण्याऐवजी समाजहिताचे कार्य व्हावे, ही माझी कायम भूमिका राहिली आहे. त्यामुळे यावर्षीदेखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी शैक्षणिक साहित्य वाटप, पाऊस पडल्यानंतर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान तसेच अन्य समाजोपयोगी उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शुभेच्छा द्याव्यात अशी भावना व्यक्त केली आहे.जाहिरात
यंदा प्रत्यक्ष भेट होणार नसली तरी कोपरगावसह विविध भागातील नागरिक, कार्यकर्ते आणि शुभेच्छुक यांचे प्रेम, आशीर्वाद आणि पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.आपण सर्वजण दाखवत असलेली आपुलकी, विश्वास आणि प्रेम हेच माझी खरी ताकद आहे. आपल्या शुभेच्छा आणि सहकार्यामुळेच समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळते, असे बिपीनदादा कोल्हे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.बिपीनदादा कोल्हे