आपला जिल्हा

विद्यार्थी हितासाठी एस. एस. जी. एम. महाविद्यालयात भव्य इमारत उभारणार

विद्यार्थी हितासाठी एस. एस. जी. एम. महाविद्यालयात भव्य इमारत उभारणार

विद्यार्थी हितासाठी एस. एस. जी. एम. महाविद्यालयात भव्य इमारत उभारणार

Kopargaon vijay kapse दि १९ जुन २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालय, कोपरगाव येथे महाविद्यालय विकास समितीचे नवनियुक्त अध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालय विकास समितीची  बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या विस्ताराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

जाहिरात

            विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या इमारतीवर प्रस्तावित अतिरिक्त १० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा दुसरा मजला बांधण्यास समितीने मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी रयत शिक्षण संस्था व संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून आवश्यक परवानगी व मान्यता प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जाहिरात

     महाविद्यालयात अलीकडेच एम.एस्सी. (झूलॉजी), एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) तसेच बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विविध रोजगाराभिमुख व कौशल्याधारित कोर्सेस या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने अतिरिक्त वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे.

जाहिरात

    दुसरा मजला पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत प्रयोगशाळा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला गती मिळण्यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे.

     या बैठकीसाठी महाविद्यालय विकास समितीचे सचिव  प्राचार्य डॉ.  माधव सरोदे,  सदस्य  सुनील गंगुले,  बाळासाहेब आव्हाड, महेंद्रशेठ काले,  महाविद्यालयातील इमारत बांधकाम समितीचे चेअरमन डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. माधव यशवंत, डॉ. देविदास रणधीर, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. निलेश मालपुरे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी  उपस्थित होते.महाविद्यालयाच्या या पायाभूत सुविधा विस्ताराने विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

काम पूर्ण झाल्यावर अशी दिसेल नवीन इमारत
इमारतीचे काम प्रगतीपथावर

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे