आपला जिल्हा

यशोधन सर्वसामान्यांसाठी ठरले मदतीचे केंद्र;   ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या योजनांसाठी मोठी मदत

यशोधन सर्वसामान्यांसाठी ठरले मदतीचे केंद्र;
ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या योजनांसाठी मोठी मदत
यशोधन सर्वसामान्यांसाठी ठरले मदतीचे केंद्र;
ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या योजनांसाठी मोठी मदत
Sangmner vijay kapse दि १९ जुन २०२६काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कायम सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवून शासन दरबारी या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला जातो. ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी प्रवासाची सुविधा मिळावी याकरता कार्ड काढून दिले जात असून नागरिक व महिलांची मोठी गर्दी होत आहे.

जाहिरात

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय हे तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेचे खऱ्या अर्थाने मदत केंद्र ठरले आहे. राजकारण विरहित सर्व नागरिकांना मदत व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या ऑफिसच्या माध्यमातून काम केले जाते.

जाहिरात

तसेच शासकीय योजनांचा व वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठीही नागरिकांना विना त्रास मदत मिळून दिली जाते. या कार्यालयात विविध विभागांसाठी स्वतंत्र कक्ष असून या कार्यालयाच्या अनुकरणातून राज्यभरात अनेक ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उभी राहिली आहे.

यशोधन हा मदतीचा ब्रँड झाला असून राज्यभरात सुरू असलेल्या एसटी पासची सुविधा जेष्ठ नागरिक व महिलांना मिळून देण्याकरता स्वतंत्र कक्ष कार्यरत असून सर्व नागरिक या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहे.

जाहिरात

आलेल्या प्रत्येक नागरिकाचे आदरतिथ्य, चहापाणी, बसण्याची व्यवस्था याचबरोबर त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखून त्यांना तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला जातो. यामुळे नागरिक व महिलांची यशोधन कार्यालयात मोठी गर्दी कायम असते.

युवकांच्या विविध प्रश्नांसाठीही सातत्याने काम सुरू असून करिअर मार्गदर्शन सह ग्रंथालय क्रीडा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.या सुविधेबद्दल तालुक्यातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात इंद्रजीत भाऊ थोरात व युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांच्या प्रति धन्यवाद व्यक्त केले आहे.

यशोधन मधून कायम चांगली सुविधा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कधीही पक्ष विचारला नाही. राजकारण केले नाही. आलेल्या प्रत्येकासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चहा पाणी देऊन आमचे आदर केला. डॉ जयश्रीताई थोरात यांनी स्वतःहून येऊन अत्यंत जिव्हाळ्याने चौकशी केली. ही माया आणि हा जिव्हाळा थोरात साहेब आणि त्यांचा परिवार कायम सर्वांशी ठेवून आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता जपणारे नेते असल्याचे ज्येष्ठ महिला जिजाबाई गुंजाळ यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे