आपला जिल्हा

कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कोअर कमिटी जाहीर

कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कोअर कमिटी जाहीर

कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कोअर कमिटी जाहीर

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ जुन २०२६– :-  कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाची संघटना अधिक सक्षम करून सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच सर्वसामान्य नागरीकांच्या अडीअडचणी तातडीने सुटाव्यात या उद्देशाने या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.

जाहिरात

कोअर कमिटीमध्ये शहरातील अनुभवी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या कोअर कमिटीमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद  अधिक वाढणार असून शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे. या कोअर कमिटीमध्ये सुनील गंगुलेदिनार कुदळेहाजीमेहमूद सय्यदमंदार पहाडेकृष्णा आढावविरेन बोरावकेबाळासाहेब रुईकररमेश गवळीइम्तियाज अत्तारशैलेश साबळेविजय त्रिभुवनसचिन गवारेराजेंद्र वाकचौरेफकीरमामू कुरेशी या अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जाहिरात

माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांनी सर्व कोअर कमिटीच्या सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.आपल्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून समन्वयाने काम करावे असे आवाहन केले. कोअर कमिटीच्या निवडी नंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून पक्षाच्या आगामी कार्यक्रमांमध्ये अधिक जोमाने सहभाग घेण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीशी शहरातील अधिकचे पाठबळ उभे करण्याचा सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी निश्चय केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे