आपला जिल्हा

डॉ. संतोष खेडलेकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानची एक लक्ष रुपयांची अभ्यासवृत्ती जाहीर  

डॉ. संतोष खेडलेकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानची एक लक्ष रुपयांची अभ्यासवृत्ती जाहीर  
तमाशाच्या बदललेल्या स्वरूपाचा होणार अभ्यास
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २८ जुन २०२६नासिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मराठी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लेखकाला रुपये एक लक्ष मुल्याची कुसुमाग्रज फेलोशिप (अभ्यासवृत्ती) दिली जाते. सन २०२६/२०२७ या वर्षासाठी  संगमनेर येथील डॉ. संतोष खेडलेकर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

जाहिरात

डॉ. खेडलेकर हे मागील तीन दशकांपासून तमाशा आणि इतिहास विषयाचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. सध्या ते संगमनेर महाविद्यालयात पुणे विद्यापिठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.  सन १९७५ ते २०२५ या पन्नास वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशाचे बदलते स्वरूप आणि त्याची कारणमीमांसा या विषयावर ते अभ्यास करणार आहेत.  या निवडीच्या वेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश होळकर, सहकार्यवाह  अॅड. राजेंद्र डोखळे, कोषाध्यक्ष अॅड. दत्तप्रसाद निकम, विश्वस्त डॉ. दिलीप धोंडगे आणि सल्लागार मंडळ सदस्य उपस्थित होते. डॉ. खेडलेकरांच्या निवडीबद्धल कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ तसेच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नासिक पदवीधर मतदार संघांचे आमदार सत्यजित तांबे, पद्मश्री रघुवीर खेडकर, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
 1975 नंतरच्या काळात तमाशात सर्वार्थाने आमुलाग्र बदल झाले आहेत. या बदलांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे होते. या संशोधनासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने माझ्यावर विश्वास दाखवून एक लाख रुपयांची फेलोशिप जाहीर केली याचा मनापासून आनंद आहे. येत्या वर्षभरात हे संशोधन पूर्ण करून त्याला पुस्तकरूप देण्याचा मानस आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे