हायवे ते राजापूर रस्ता कॉंक्रिटीकरण तातडीने करा; राजापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी
हायवे ते राजापूर रस्ता कॉंक्रिटीकरण तातडीने करा; राजापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी

Sangmner vijay kapse दि २८ जुन २०२६-संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असणारा संगमनेर ढोलेवाडी राजापूर जवळे कडलग गणोरे या रस्त्यावरील काँक्रिटीकरण अत्यंत चांगले झाले असून याच प्रमाणे नाशिक पुणे महामार्ग (बोगदा) ते राजापूर रस्त्याचे तातडीने कॉंक्रिटीकरण करावे अशी आग्रही मागणी राजापूर सह विविध ग्रामस्थांनी केली आहे.


याचप्रमाणे नाशिक पुणे हायवे (बोगदा) ते राजापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. हा रस्ता पश्चिम भागासह अकोले तालुक्याला जोडणारा असून यावरील विविध गावांमधील नागरिकांना दळणवळणासाठी चांगल्या सुविधा मिळाव्या याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू असून हा रस्ता तातडीने झाला पाहिजे अशी आग्रही मागणी या ग्रामस्थांची आहे.

यामुळे राजापूर, गुंजाळवाडी, चिकणी ,निमगाव भोजापुर, जवळेकडलग सह पश्चिम भागातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी, याचबरोबर वृद्ध नागरिक परिसरातील शेतकरी महिला यांच्याकरता अत्यंत सोय होणार आहे. या भागामध्ये भाजीपाला उत्पादक मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा भाजीपाला बाजारामध्ये आणण्यासाठी हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे . त्याचबरोबर आजारी नागरिकांना तातडीने दवाखान्यात येण्यासाठी किंवा शहरात पोहोचवण्यासाठी हा रस्ता कॉंक्रिटीकरण होणे अत्यंत गरजेचे असून शासनाने विना विलंब हा रस्ता तातडीने काँक्रिटीकरण करावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




