आपला जिल्हा

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांचे पद धोक्यात?  काळे गटाचा कोल्हे गटाला जोरदार झटका

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांचे पद धोक्यात?  काळे गटाचा कोल्हे गटाला जोरदार झटका

जितेंद्र रणशूर यांचा बनावट जात प्रमाणपत्र रद्द, उपनगराध्यक्षपदही लवकरच जाणार काळे गटाचा कोल्हे गटाला जोरदार झटका

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २९ जुन २०२६ :- कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मिळविले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरच्या तक्रारीची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दखल घेवून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता जितेंद्र रणशूर यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसून आल्यामुळे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आला असून त्यामुळे त्यांचे उपनगराध्यक्षपदही लवकरच जाणार आहे हा काळे गटाकडून हा कोल्हे गटाला देण्यात आलेला मोठा झटका मानला जात आहे.

जाहिरात

२०२५ मध्ये पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ हा प्रभाग एस.सी.प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा एस.सी. प्रवर्गातीलच असणे आवश्यक होते. परंतु या प्रभागातून आपले नाम निर्देशनपत्र भरतांना विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीचा केलेला उल्लेखच चुकीचा होता.उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत खोटी माहिती देवून बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविली असून त्याबाबतचे सर्व पुरावे व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशा आशयाची तक्रार अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांनी केली होती.

जाहिरात

त्या तक्रारीची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने गांभीर्याने दखल घेवून त्याबाबत सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. वडिलांची जात मुलाच्या दाखल्यावर असते त्यामुळे वडिलांची जात वेगळी आणि मुलाची जात वेगळी असे असु शकत नाही. मात्र जितेंद्र रणशूर यांच्या वडिलांच्या दाखल्यावर वेगळी जात आणि जितेंद्र रणशूर यांच्या दाखल्यावर वेगळी जात असल्याचे मिळालेल्या कागदपत्रातून दिसून आले. त्यामुळे जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जितेंद्र रणशूर यांनी दिलेला जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.या निर्णयाचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वागत केले असून सागर आहेर यांच्या वतीने वतीने अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

 जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा मोनिका सिंहसदस्य राकेश पाटील आणि सदस्य सचिव अनिल तिदमे यांनी संयुक्तपणे दिलेल्या आदेशानुसार जितेंद्र रणशूर यांनी अनुसूचित जाती प्रमाणपत्राच्या आधारे जे काही शासकीयनिमशासकीय किंवा इतर लाभ मिळवले असतील ते सर्व लाभ कायदेशीररित्या अवैध ठरवून ते वसूलपात्र करण्यात आले आहे. जितेंद्र रणशूर यांचे अनुसूचित जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारीशिर्डी यांना तत्काळ जमा करून घेण्याचे आदेश देखील दिले आहे.- तक्रारदार सागर आहेर.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे