एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई-आमदार आशुतोष काळे

एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई-आमदार आशुतोष काळे
एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई-आमदार आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि २९ जुन २०२६ :- कोपरगाव तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसानभरपाई जाहीर केली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली असून एपिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेकडो हेक्टरवरील काढणीला आलेल्या पिकांसह डाळिंब, टरबूज आदीसह फळबागांचे, चारा पिकांचे आणि कांदा काढून झाकून ठेवलेल्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत सापडला होता.

शेतकरी आलेल्या नैसर्गिक संकटाला न घाबरता नेहमीच मोठ्या हिमतीने उभा राहिला आहे.त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळविता येईल यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या तयारीसाठी मदत होणार आहे.
पावसाने जरी उशीर केला असेल मात्र महायुती शासनाने या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ देण्याचे आपले काम चोखपणे बजावले आहे. ऐन अडचणीच्या काळात खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेले आर्थिक भांडवल आमदार आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई रक्कम मंजूर केल्याबदल कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्रीम.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, कृषी मंत्री ना.दत्तामामा भरणे,मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंदजी जाधव पाटील, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहे.




