आपला जिल्हा

यशदीप दिघे यांची लेफ्टनंटपदी निवड अभिमानास्पद – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

यशदीप दिघे यांची लेफ्टनंटपदी निवड अभिमानास्पद – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

जोर्वे येथे भव्य नागरी सत्कार

Sangmner vijay kapse दि २ जुलै २०२६शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या यशदीप दिघे यांने वडिलांकडून भारतीय सैन्य दलाच्या सेवेचा वारसा घेतला. संघर्ष परिश्रम आणि ध्येय ठेवून त्याने मिळवलेले यश हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. यशदीप दिघे यांची एनडीए मधून लेफ्टनंटपदी झालेली निवड ही सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

जोर्वे येथे ग्रामस्थांच्या वतीने यशदीप राजेंद्र दिघे यांची लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्री थोरात,रावसाहेब दिघे, मेजर राजेंद्र दिघे, अर्जुन दिघे, सर्जेराव दिघे, सुरेश थोरात, विठ्ठल काकड, बादशहा बोरकर, संजय थोरात, रमेश थोरात, अनिल थोरात, पी.वाय.दिघे, मुक्ता दिघे, प्रांजल दिघे, नामदेव कहांडळ, नानासाहेब दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यशदीप दिघे हा जोर्वे येथील रहिवासी असून वडील राजेंद्र दिघे हे भारतीय सैन्यदलात नोकरीत होते. पुणे येथे 3 वर्ष एनडीएचे प्रशिक्षण घेऊन देहराडून येथे एक वर्षाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. आता त्यांची निवड काश्मीर मधील लडाख येथे लेफ्टनंटपदी झाली आहे.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजोबा रावसाहेब दिघे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट केले. शेतीमध्ये कष्ट करून हा परिवार फुलवला. मुलांना संस्कार दिले.राजेंद्र दिघे यांनी देशाच्या सीमेवर विविध ठिकाणी सेवा दिली. ती प्रेरणा घेऊन मुलगा यशदीप याने एनडीए मधून मोठे यश मिळवले आहे. ही बाब तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे.

जाहिरात

आपल्या मुलांना संधी मिळाली की ते त्याचं सोनं करतात हे वैशिष्ट्य आहे. तालुक्यातील अनेक मुलं विविध ठिकाणी मोठ मोठ्या पदांवर काम करत आहे. आणि हा आपल्या सर्वांचा अभिमान आहे. मुलांनी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जावं. कुटुंबाचं आणि तालुक्याचे नाव मोठे करावे असे सांगताना यश परिश्रम आणि सातत्य जर ठेवले तरी तुम्हाला मोठे नाव मिळेल. यशदीप दिघे यांची देश सेवेसाठीची ही वाटचाल नवीन विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, एनडीए साठी निवड होणे हे अवघड बाब आहे. याकरता तरुणांना अभ्यास परिश्रम आणि सातत्य महत्त्वाचा आहे. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड होणे हे सर्वांसाठी गर्वाची बाब आहे. यशदीप हे सैन्यदलात उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या तालुक्याचा लौकिक वाढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी सातत्याने परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. रील च्या बाहेर येऊन रियल लाईफ यशस्वी होण्यासाठी काम करा. सैन्यदलाचा गणवेश हा युवकांसाठी स्फूर्तीदायी ठरणारा असल्याचे त्या म्हणाल्या.

तर लेफ्टनंट यशदीप दिघे म्हणाले की, लहानपणापासूनच सैन्य दलात मोठ्या पदावर जाण्याची माझी इच्छा होती. ध्येय ठेवून मी सातत्याने अभ्यास केला. यामध्ये आई – वडील आणि कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळाला. अभ्यास आणि मैदानी खेळ यावर मी भर दिला. रील मोबाईल यापासून कायम दूर राहिलो. लडाख मधील पहिली पोस्टिंग ही माझ्यासाठी मोठी अनुभव देणारी ठरणार असून संगमनेर तालुक्याच्या एकनिष्ठपणाची आणि प्रामाणिकपणाची संस्कृती मी कायम जपेल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव कहांडळ यांनी केले. सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले तर मेजर राजेंद्र दिघे यांनी आभार मानले. यावेळी जोर्वे परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे