आपला जिल्हा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २ जुलै २०२६अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथे १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जवळे कडलग येथे शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी विष्णुपंत आनाजी रहाटळ, संजय मोहन देशमुख,ओमप्रकाश दिलीप देशमुखवश्री. राहुल कजबे उपस्थित होते.

यावेळी विष्णुपंत रहाटळ यांनी विद्यार्थ्यांना स्व.वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची माहिती देत शेतीशी नाळ कायम जोडून ठेवण्याचे, वेळेचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वाचनाची सवय जोपासण्याचे महत्त्व सांगितले. संजय देशमुख यांनी आधुनिक शेतीतील संधी व पीक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

जाहिरात

शिवार फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी विष्णुपंत रहाटळ व ओमप्रकाश देशमुख यांच्या द्राक्ष बागांची पाहणी करून आधुनिक द्राक्षबाग व्यवस्थापन, छाटणी, पोषण व सिंचन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. यावेळी राहुल कजबे यांनी द्राक्ष बागेचे वैज्ञानिक व्यवस्थापन,कॅनोपी व्यवस्थापन, घडांची गुणवत्ता सुधारणा, रोग – कीड व्यवस्थापन, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन तसेच बाजार पेठाभिमुख शेती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विष्णुपंत रहाटळ यांच्या डाळिंब बागेतील आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि उन्हाळ्यातील उच्च तापमानाचा सामना करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या टोमॅटो प्लॉटमधील प्रगत तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस. वाघ यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासातील योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.

हा कार्यक्रम मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा.जी.बी.बाचकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विशाल वाळे होते. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत जवळे कडलग येथे कार्यरत कृषिदूत कु.ओम औताडे, कु.श्रेयश देशमुख, कु.शिवराज बोऱ्हाडे, कु.पार्थ आहेर, कु.अनिकेत औताडे आणि कु.अजित बागडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे