आपला जिल्हा

डिजिटल  युगातील सुवर्णसंधी : एस.एस.जी.एम. महाविद्यालयात बी.एस्सी. सायबर सिक्युरिटीसाठी प्रवेश सुरू

डिजिटल  युगातील सुवर्णसंधी : एस.एस.जी.एम. महाविद्यालयात बी.एस्सी. सायबर सिक्युरिटीसाठी प्रवेश सुरू

डिजिटल  युगातील सुवर्णसंधी : एस.एस.जी.एम. महाविद्यालयात बी.एस्सी. सायबर सिक्युरिटीसाठी प्रवेश सुरू

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ जुलै २०२६ : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल व्यवहारांच्या वेगाने वाढणाऱ्या युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अभूतपूर्व वाढले आहे. उद्योगजगताला कुशल सायबर सुरक्षा तज्ज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव येथे बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी या अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जाहिरात

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, जागतिक स्तरावरील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देतो. संगणक प्रणाली, नेटवर्क, क्लाऊड, मोबाईल तंत्रज्ञान, डिजिटल डेटा आणि ऑनलाइन व्यवहार सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले आधुनिक ज्ञान व प्रात्यक्षिक प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाणार आहे.

जाहिरात

या विषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी सांगितले की, “बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून त्यासाठी ८० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांमध्ये इंडस्ट्री-ओरिएंटेड उपक्रम, अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब, एथिकल हॅकिंग, डिजिटल फॉरेन्सिक्स, नेटवर्क व क्लाऊड सिक्युरिटी, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण, इंटर्नशिप तसेच कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार सक्षम, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि रोजगाराभिमुख बनविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, एथिकल हॅकर, सिक्युरिटी कन्सल्टंट, एस.ओ.सी. अॅनालिस्ट, डिजिटल फॉरेन्सिक्स एक्स्पर्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर तसेच नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर अशा उच्च मागणीच्या पदांवर करिअर घडविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. शासकीय, निमशासकीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या क्षेत्रातील प्रशिक्षित तज्ज्ञांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होणार आहेत.

जाहिरात

ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून अत्यंत माफक शुल्काबरोबर शिष्यवृत्तीसह  हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर सुरक्षा क्षेत्रात झपाट्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी लक्षात घेता, कोपरगाव तालुका व परिसरातील हा एकमेव बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम उपलब्ध असून, मर्यादित प्रवेशक्षमतेमुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे