आपला जिल्हा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जिल्ह्यात स्वागत

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जिल्ह्यात स्वागत

अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात स्वागत,

अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांसाठी सुविधा.

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ५ जुलै २०२६रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईले नटलेला सुंदर परिसर, विठू नामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी अत्यंत भक्तीमय वातावरणात वारकरी संप्रदायाचे पाईक महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात स्वागत व पूजन केले.

जाहिरात

पारेगाव बु. येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी मा.कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,डॉ.कुणाल सोनवणे, बी.आर.चकोर, अविनाश सोनवणे,हौशीराम सोनवणे,सुभाष सांगळे, संपतराव गोडगे, डॉ.दत्तात्रय गडाख, ॲड. त्रंबक गडाख, दौलतराव गडाख, सोमनाथ गडाख, दिंडीचे माधव महाराज राठी आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

त्र्यंबकेश्वर वरून निघालेल्या या वारीमध्ये सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात आज जिल्ह्यात प्रवेश केला. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व विद्यार्थ्यांनी केलेली पारंपारिक वेशभूषा,स्वागताच्या कमानी नी नटलेला परिसर यांसह सर्व गावकऱ्यांनी व सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

जाहिरात

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे.यामध्ये जात – पात धर्म असा कोणताही भेदभाव नाही. शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी पंढरीची वारी ही आनंदवारी असते.

शांतता, समानता, एकता आणि सद्भावना याची प्रतीक असलेली पंढरीची वारी ही जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगाच्या दृष्टीने ही या वारीचे मोठे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणून परदेशातूनही अनेक भाविक भक्तगण या वारीच्या निमित्ताने पंढरपुरात येत असतात.माऊली या एका शब्दाने सर्वजण एकत्र बांधले जातात.

जाहिरात

पावसाला यावर्षी आता सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप पाऊस पुरेसा नाही. दुष्काळाचे सावट आहे. हे सावट दूर होऊन संपूर्ण राज्यांमध्ये आणि देशांमध्ये यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडावा.शेतकरी, नागरिक, आणि सर्व जनता सुखी समाधानी होऊ दे अशी प्रार्थना ही यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंगाच्या चरणी केली.

खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून स्वागताची ही परंपरा आहे. पंढरीच्या वारीमध्ये कधीही भेदभाव नसतो. समतेचा संदेश या वारीतून दिला जातो. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडून महाराष्ट्रातील जनता सुखी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

तर डॉ.जयश्री ताई थोरात म्हणाल्या की, विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात. भेदभाव विसरून एकत्र येऊन आनंदाने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून मागील वर्षी संगमनेर तालुक्यातील 1000 युवकांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. या निमित्ताने यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना ही कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केली.

विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या समवेत अभंग गायले. हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.

जाहिरात

अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांसाठी सुविधा

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे मागील अनेक वर्षांपासून लोकनेते बाळासाहेब थोरात हे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करताना स्वागत व पूजन करत असून दरवर्षी अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीही अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने 25 डॉक्टरांचे पथक, नर्स, वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, राहण्याची सुविधा अशा अद्यावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तालुक्यातील सर्व गावांमधून या वारकऱ्यांचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात येत असून त्यांना सुविधा दिल्या जाणार आहे. या सुविधांबद्दल सर्व वारकरी बांधवांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे