आपला जिल्हा

रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यावर एस. एस.जी.एम. महाविद्यालयाचा भर

रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यावर एस. एस.जी.एम. महाविद्यालयाचा भर

रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यावर एस. एस.जी.एम. महाविद्यालयाचा भर

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १० जुलै २०२६ ; बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य आणि व्यावसायिक क्षमता हीच यशस्वी करिअरची गुरुकिल्ली ठरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संकल्पनेनुसार रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

जाहिरात

     महाविद्यालयात रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस, ब्युटी पार्लर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, स्टॉक मार्केट, फ्रंट ऑफिस डेव्हलपमेंट, फ्लॉवर स्टॉक डेव्हलपमेंट, क्लिनिकल व पॅरामेडिकल तंत्रज्ञान, मशरूम कल्टिव्हेशन, पशुपालन प्रशिक्षण, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे विश्लेषण, फॉरेन्सिक सायन्स तंत्रज्ञान, फळ प्रक्रिया तंत्रज्ञान, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, नर्सरी व गार्डनिंग व्यवस्थापन, विद्युत गृहउपकरणे दुरुस्ती व देखभाल, पत्रकारिता आणि भाषांतर,व्यक्तिमत्त्व विकास,मायक्रमनिर्मिती, फॅशन डिझायनिंग  अशा विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कार्यानुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योगक्षेत्राला आवश्यक व्यावहारिक कौशल्ये, तसेच समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. प्रात्यक्षिके, कार्यशाळा, प्रकल्प आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून ते रोजगारासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी सक्षम बनत आहेत. स्टॉक मार्केट, ब्युटी पार्लर, मशरूम उत्पादन, फ्लॉवर स्टॉक डेव्हलपमेंट यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची वृत्ती विकसित करत आहेत. त्याचबरोबर संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, वेळेचे नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचाही विकास होत असल्याने विद्यार्थी स्पर्धात्मक युगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास तयार होत आहेत.

जाहिरात

 कौशल्याधारित अभ्यासक्रमांविषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले,की, “आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या रोजगारविश्वात विद्यार्थ्यांकडे पदवीबरोबरच आवश्यक कौशल्ये असणे अत्यावश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन महाविद्यालयात विविध कौशल्याधारित व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक क्षमता, आत्मविश्वास, उद्योजकता आणि रोजगारक्षम कौशल्यांचा विकास होत असून ते उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार सक्षमपणे कार्य करण्यास तयार होत आहेत. विद्यार्थ्यांना ‘जॉब रेडी’ आणि ‘फ्युचर रेडी’ बनविणे हेच या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”.

जाहिरात

 या उपक्रमांना महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.संदीप वर्पे, सदस्य आमदार विवेक कोल्हे, चैतालीताई काळे,  सुनील गंगुले यांसह इतर सदस्यांचे  मोलाचे मार्गदर्शन लाभत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे