आपला जिल्हा

स्व. अजितदादांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी; आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात सरकारकडे मागणी

स्व. अजितदादांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी; आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात सरकारकडे मागणी

स्व. अजितदादांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी; आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात सरकारकडे मागणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १० जुलै २०२६ :केवळ देशातीलच नव्हे तर जगात जिथे-जिथे मराठी माणुस रहातो त्यांच्या मनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित(दादा) पवार यांच्या अपघाती मृत्यु बाबत संशयाचे वातावरण आहे. त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्युला पाच महिने पूर्ण झाले. लोक आम्हाला विचारतात हा अपघात कसा झालानेमके काय झाले असे प्रश्न विचारले गेले की आम्ही निरूत्तर होतो. त्यांच्या या अपघाती मृत्युची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी. दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी. त्यासाठी हवे तर पाहिजे त्या यंत्रणांची मदत घ्यावी. अशी मागणी आज आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत बोलतांना केली.

जाहिरात

ते म्हणालेगेल्या २८ जानेवारी रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. हि घटना घडून  आता सहावा महिना सुरू आहे. मात्र अद्यापही या अपघाता बाबत लोकांच्या मनातील संशय आजही कायम आहे. राज्या बाहेर किंवा देशा बाहेर गेल्यावर तेथील मराठी माणसे आम्हाला विचारतात. तुम्ही काय करता, त्यामुळे आम्ही सांगतो आम्ही स्व.अजित(दादा) पवारांच्या पक्षाचे लोकप्रतिनीधी आहोत.

जाहिरात

त्यांचा दुसरा प्रश्न असतो त्यांचा अपघात कसा घडला आणि नेमके काय झाले. अशावेळी आम्ही निरूत्तर होऊन जातो. एवढ्या मोठा पदावर असलेल्या नेत्याच्या बाबतीत अशी घटना होऊ शकते. अशावेळी आपल्या सारख्या सामान्य माणसाचे काय होईल. आपल्या बाबतीत अशी घटना घडली तर कायअसा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आपण हव्या तेवढ्या यंत्रणांची मदत घ्यावी मात्र लवकरात लवकर तपास पूर्ण करून अपघातामागचे सत्य जनतेसमोर आणावे. कोणी दोषी आढळले तर कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे