आपला जिल्हा

संगमनेर काँग्रेस तालुकाध्यक्षपदी फटांगरे, शहराध्यक्षपदी दिवटे तर कार्याध्यक्षपदी शेलकर यांची निवड

संगमनेर काँग्रेस तालुकाध्यक्षपदी फटांगरे, शहराध्यक्षपदी दिवटे तर कार्याध्यक्षपदी शेलकर यांची निवड

संगमनेर काँग्रेस तालुकाध्यक्षपदी फटांगरे, शहराध्यक्षपदी दिवटे तर कार्याध्यक्षपदी शेलकर यांची निवड

Sangmner vijay kapse दि १८ जुलै २०२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अजय नारायण फटांगरे यांची तालुकाध्यक्षपदी, सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांची शहराध्यक्षपदी पुनर्नियुक्ती, तर अमोल भारत शेलकर यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. राज्यभर राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानातून निरीक्षकांनी घेतलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या संवादानंतर प्राप्त झालेल्या शिफारशींच्या आधारे या नियुक्त्या करण्यात आल्या.

जाहिरात

नवनियुक्त तालुकाध्यक्ष अजय फटांगरे हे युवक काँग्रेसपासून पक्षात सक्रिय असून त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
शहराध्यक्ष म्हणून पुन्हा संधी मिळालेले सोमेश्वर दिवटे हे संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक असून युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावली आहे.

जाहिरात

तालुका कार्याध्यक्षपदी निवड झालेले अमोल शेलकर हे २०१० पासून काँग्रेसमध्ये कार्यरत असून विविध जनआंदोलनांमधील सक्रिय सहभागामुळे ते पक्षाचा आंदोलनशील चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे पक्षाने नव्या दमाच्या तरुण नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, काँग्रेसचा लोकशाही व राज्यघटना जपणारा विचार जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही नवी टीम जोमाने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

 माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे