राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदार यादी शुद्धीकरण महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान द्यावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदार यादी शुद्धीकरण महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान द्यावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदार यादी शुद्धीकरण महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान द्यावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyanagar vijay kapse दि १८ जुलै २०२६-मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) हे केवळ निवडणुकीसाठी नसून राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व अहील्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

अहील्यानगर शहर मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा आढावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाढे, उपमहापौर धनंजय जाधव, प्रांताधिकारी सुधीर पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणाले की, काही प्रभागांमध्ये मतदार मॅपिंगचे काम समाधानकारक झाले असले तरी काही ठिकाणी हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन आणि पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये अधिक समन्वय आवश्यक आहे. एसआयआर मोहिमेला मुदतवाढ मिळाल्याने उर्वरित कालावधीत अधिक प्रभावी काम करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी करणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी ते होत नसल्याची बाब त्यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. दुबार नोंदणी, मृत व्यक्तींची नावे व स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासन आणि पक्षाने नियुक्त केलेले प्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पश्चिम बंगालचे उदाहरण देत विखे पाटील यांनी मतदार याद्या शुद्ध करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व विश्वासार्ह मतदार यादी हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासूनच्या मतदार याद्यांवर निवडणुका होत आहेत. मात्र शहरी व ग्रामीण भागातील स्थलांतरामुळे अनेक मतदारांची नावे जुन्याच ठिकाणी कायम आहेत. त्यामुळे ही मोहीम अत्यंत जागरूकतेने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काही धार्मिक स्थळांमधून मतदार मॅपिंगचे काम सुरू असल्याची गंभीर तक्रारही त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले.
“मतदार मॅपिंगसह संपूर्ण प्रक्रिया शासकीय कार्यालयात किंवा संबंधित गावातील शाळांमध्येच पार पडली पाहिजे. धार्मिक स्थळांमधून असे काम होत असल्याची तक्रार अत्यंत गंभीर असून, याची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना दिले आहेत,”



