रेणुका कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त येसगाव येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप

रेणुका कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त येसगाव येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप
रेणुका कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त येसगाव येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप
Kopargaon vijay kapse दि २१ जुलै २०२६: न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे संजीवनी शैक्षणिक, कृषी आणि ग्रामविकास संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी तथा संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विनायक एंटरप्रायझेसच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास येसगावचे सरपंच पुंडलिक वामन गांगुर्ड, माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा नंदिनी सुराळकर, येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, उपसरपंच संदीपभाऊ गायकवाड, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य दत्तात्रय गंगाधर आहेर, शिवाजी कोकाटे, गोरख आहेर, दगडू दरेकर, बापूसाहेब सुराळकर, किरण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अमोल झावरे, नानासाहेब गायकवाड, शंकरराव पाईक, अभिषेक कोल्हे, सुमीत दरेकर, पगारे सर, केंद्रप्रमुख आशिष पारडे, प्रदीप आहेर तसेच सचिन भालके आदी मान्यवर उपस्थित होते.

विनायक एंटरप्रायझेसच्या वतीने राजेश पोटलिया (इंजिनिअर), सुरेंद्रकुमार शर्मा (मॅनेजर), रविंद्र शिंगाडे आणि रामपाल काला उपस्थित होते. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. बापूसाहेब सुराळकर, नंदिनी सुराळकर आणि किरण दिलीप गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत रेणुका कोल्हे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
अध्यक्षीय भाषणात रेणुका विवेक कोल्हे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर जीवनात यशस्वी होण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक रामदास गायकवाड यांनी केले, तर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि विनायक एंटरप्रायझेसच्या प्रतिनिधींचे आभार मानले. या उपक्रमास विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि येसगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.



