आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात क्रिकेटपटूंसाठी आधुनिक सराव नेट्सची सुविधा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात क्रिकेटपटूंसाठी आधुनिक सराव नेट्सची सुविधा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात क्रिकेटपटूंसाठी आधुनिक सराव नेट्सची सुविधा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ जुलै २०२६: रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेजच्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच सिनियर कॉलेजच्या विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धांच्या तयारीसाठी आधुनिक क्रिकेट सराव नेट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सराव नेट्सचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. संदीप वर्पे यांच्या हस्ते करण्यात आले.

जाहिरात

यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले, प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी अॅड. संदीप वर्पे यांनी खेळाडूंनी सांघिक भावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती जोपासत सातत्यपूर्ण सराव करावा, असे आवाहन केले. खेळाडूंना अधिकाधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

सुनील गंगुले यांनी नियमित सरावातून खेळाडूंनी आपल्या कौशल्यात प्रावीण्य मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचवावे, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी युवा क्रिकेटपटूंना आवश्यक साहित्य व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कायम प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमास वरिष्ठ कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार, क्रीडा शिक्षक श्री. कदम, प्रा. गोराणे, शांतीलाल अग्रवाल, रविंद्र हिंगे, क्रिकेट मार्गदर्शक शिंदे, एस. जे. चव्हाण यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे