मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात ‘महा रक्तदान शिबिर’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात ‘महा रक्तदान शिबिर’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात ‘महा रक्तदान शिबिर’

Kopargaon vijay kapse दि २१ जुलै २०२६ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने बुधवारी (दि. २२ जुलै) सकाळी ९ वाजता व्यापारी धर्मशाळा, कोपरगाव येथे ‘महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
“तुमचे रक्तदान… सामाजिक जाणिवेतून” या संकल्पनेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या शिबिरामागील उद्देश असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हे रक्तदान शिबिर बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता व्यापारी धर्मशाळा, कोपरगाव येथे होणार असून, नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले आहे.





