आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ जुलै २०२६  : ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना पोलीस दलात करिअरची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय (एस.एस.जी.एम.), कोपरगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन बुधवार दि. २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या अकॅडमीचे उद्घाटन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. संदीप वर्पे राहणार आहेत.

जाहिरात

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन ॲड. भगीरथ (काका) शिंदे, माजी आमदार रोहित पवार, आमदार विवेक कोल्हे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेश बोळीज, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या  चैताली काळे, सुनील गंगुले, महेंद्रशेठ काळे, डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, बाळासाहेब आव्हाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुदाम शेळके (ज्ञानदा अकॅडमी, सिन्नर), सागर खालकर (एस. के. फिटनेस अकॅडमी, संगमनेर), साईनाथ वर्पे (आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी) व साजन चव्हाण हे भरतीपूर्व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणारी ही अकॅडमी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी उपयुक्त ठरणार असून शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे