आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या प्रबुद्ध संजय इंगळेची लेफ्टनंटपदी निवड

आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या प्रबुद्ध संजय इंगळेची लेफ्टनंटपदी निवड
आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या प्रबुद्ध संजय इंगळेची लेफ्टनंटपदी निवड
Kopargaon vijay kapse दि २१ जुलै २०२६ : आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा विद्यार्थी प्रबुद्ध संजय इंगळे याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे. या यशामुळे अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, अकॅडमीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंदे यांनी दिली. प्रबुद्धच्या यशामुळे अकॅडमीतील प्रशिक्षकांच्या मेहनतीचे सार्थक झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही सैन्यदलात अधिकारी होण्याची नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी प्रबुद्ध इंगळे याचे अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अकॅडमीत मिळालेले दर्जेदार प्रशिक्षण आणि अध्यात्मिक वातावरणातून मिळालेले संस्कार हेच या यशामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक शिंदे म्हणाले, “राष्ट्रप्रेम, शिस्त, चारित्र्य आणि सेवाभाव जपणारे जबाबदार अधिकारी घडविण्याचे संस्थेचे ध्येय आहे. पालकांचा विश्वास, प्रशिक्षकांचे समर्पित कार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे प्रबुद्धची जडणघडण झाली. भविष्यातही आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीतील अनेक तरुण भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

“आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी देशप्रेमाने भारलेला असतो. शिस्त, देशप्रेम आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या आधारे येथे विद्यार्थ्यांची जडणघडण केली जाते. प्रबुद्ध इंगळेने आपल्या यशाचे श्रेय संस्थेतील प्रशिक्षक आणि येथे मिळालेल्या देशसेवेच्या प्रेरणेला दिले आहे. हे संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद यश आहे.”
नंदकुमार सुर्यवंशी (अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट)




