अंतिम परीक्षेपूर्वीच अमृतवाहिनी आयटीआयच्या १०७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड

अंतिम परीक्षेपूर्वीच अमृतवाहिनी आयटीआयच्या १०७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड
अंतिम परीक्षेपूर्वीच अमृतवाहिनी आयटीआयच्या १०७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड

Sangmner vijay kapse दि २३ जुलै २०२६ : अमृतवाहिनी आयटीआय, अमृतनगर येथील १०७ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच बजाज ऑटो लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली.

अमृतवाहिनी आयटीआय येथे १४ जुलै २०२६ रोजी बजाज ऑटो लिमिटेड, पुणे यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे एचआर मॅनेजर गणेश जाधव व प्रोडक्शन मॅनेजर तानाजी पाटील यांनी अंतिम वर्षातील मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामधून १०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

याबाबत प्राचार्य विलास भाटे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज संस्थेचे अनेक विद्यार्थी देश-विदेशात विविध जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआयमध्ये गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेवर विशेष भर दिला जात आहे. त्याच प्रयत्नांचे फलित म्हणून अंतिम परीक्षेपूर्वीच १०७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी मिळाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. व्ही. बी. धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य विलास भाटे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


