आपला जिल्हा

संजीवनी युनिव्हर्सिटीचे क्रीडा नियोजन कौतुकास्पद   – डाॅ. प्रवीण अनावकर  

संजीवनी युनिव्हर्सिटीचे क्रीडा नियोजन कौतुकास्पद   – डाॅ. प्रवीण अनावकर  


                         संजीवनीमध्ये देशाच्या सॉफ्टबॉल संघाची निवड चाचणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३१ जुलै २०२६राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघ निवड चाचण्यांसाठी संजीवनी युनिव्हर्सिटीची निवड करण्यामागे येथील उत्कृष्ट क्रीडा सुविधा आणि दर्जेदार मैदान हेच प्रमुख कारण आहे. या निवड चाचण्या संजीवनीमध्ये आयोजित करण्याची आमची इच्छा अनेक वर्षांपासून होती, मात्र यंदा ही संधी  जुळून आली. संजीवनीने केलेले क्रीडा नियोजन आणि उपलब्ध करून दिलेल्या सुविधा निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ. प्रवीण अनावकर यांनी केले.

जाहिरात

        अंडर-१५ गर्ल्स सॉफ्टबॉल एशिया कप २०२६ आणि एशियन युनिव्हर्सिटीज वुमेन्स सॉफ्टबॉल कप २०२६ या चीन व तैवाण मध्ये होणाऱ्या विश्वव्यापी स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघ निवड चाचण्यांच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. अनावकर बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे होते. महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी श्री प्रदीप तळवेलकर, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे जॉईंट सेक्रेटरी  ओमप्रकाश शर्मा आदी उपस्थित होते.   प्रास्ताविक डीन ऑफ स्पोर्ट्स  श्री  विरुपक्ष रेड्डी यांनी केले.

जाहिरात

    यावेळी सॉफ्टबॉल क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सॉफ्टबॉलपटूंचा व प्रशिक्षकांचा  अमित कोल्हे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनावकर यांनी ऑक्टोबर महिन्यात चीनमध्येे अंडर-१५ गर्ल्स सॉफ्टबॉल एशिया कप २०२६, तर तैवानमध्ये एशियन युनिव्हर्सिटीज वुमेन्स सॉफ्टबॉल कप २०२६ स्पर्धा होणार असल्याची माहिती दिली. या संजीवनीमध्ये होत असलेल्या निवड चाचण्यांमधूनच दोन्ही स्पर्धांसाठी भारताचा अंतिम संघ निश्चित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री तळवेलकर यांनी खेळाडूंना सातत्य, संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व पटवून देत तुम्हे लंबा चलना है, असा संदेश खेळाडूंना दिला. १९६७ मध्ये महाराष्ट्रात पुणे शहरापुरता मर्यादित असलेला सॉफ्टबॉलचा खेळ आज राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विद्यापीठांमध्ये खेळला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी महाराष्ट्रात दोन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाल्याची माहिती देताना ग्रामीण भागातील खेळाडूंनाही अधिक शासकीय पाठबळ मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
    यावेळी हेड ऑफ जनरल अॅडमिनिस्ट्रेशन तथा जीमखाना इन्चार्ज  नानासाहेब लोंढे, प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने स्पर्धक खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वस्तिका जगताप आणि धनश्री देवकर या विद्यार्थिनींनी केले.


यंदाच्या राष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्याचा सन्मान संजीवनी युनिव्हर्सिटीला  मिळाला आहे. सॉफ्टबॉलला समृद्ध इतिहास असून अमेरिकेतील शिकागो  येथे १८८७ मध्ये या खेळाचा उगम झाला. सध्या जगातील १४५ देशांहून अधिक देशांमध्ये हा खेळ खेळल्या जातो. जपान, तैवान आणि चीनसारख्या देशांनी या खेळात जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण केले आहे. शिस्त, मेहनत आणि संघभावना या गुणांच्या बळावर खेळाडूुंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवावे.आज या मैदानावरून निवड होणाऱ्या  मुलींपैकी एखादी खेळाडू उद्या आशियाई स्पर्धेत किंवा ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावेल, असा मला विश्वास वाटतो. –  अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे