लोकनेते ॲड. भिमराव (नाना) बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आमदार विवेक कोल्हे यांचे विनम्र अभिवादन

लोकनेते ॲड. भिमराव (नाना) बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आमदार विवेक कोल्हे यांचे विनम्र अभिवादन
लोकनेते ॲड. भिमराव (नाना) बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आमदार विवेक कोल्हे यांचे विनम्र अभिवादन

Kopargaon vijay kapse दि २ ऑगस्ट २०२६: अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पहिले लोकसभा खासदार, लोकनेते ॲड. स्व. भिमराव (नाना) बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक, कोपरगाव येथे प्रतिमा पूजन, वृक्षारोपण आणि पालकत्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. धर्मयोद्धा माजी खासदार ॲड. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत, शाखा कोपरगाव यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून लोकनेते ॲड. भिमराव (नाना) बडदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, लोकनेते ॲड. भिमराव (नाना) बडदे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. विशेषतः कोपरगावच्या पाणीप्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवून सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. समाजहिताची त्यांची तळमळ, विकासाची दूरदृष्टी आणि जनसेवेची निष्ठा ही आजच्या पिढीसाठी आदर्शवत असून त्यांचा कार्यवारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे.
जयंती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच पालकत्व अभियानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, दिलीप दारुणकर, बाळासाहेब नरोडे, सागर बडदे, दत्तु पगारे, कैलास मंजुळ, दिलीप घोडके सर, ॲड. जयंत जोशी, सुशांत घोडके, योगेश वाणी, संतोष गंगवाल, सतीशअण्णा काकडे, दीपकराव साळुंके, रविंद्र निकम, सतीश चव्हाण, रोहिदास पाखरे, किशोर मांडगे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लोकनेते ॲड. स्व. भिमराव (नाना) बडदे यांच्या विचारांचा आणि जनसेवेच्या आदर्शाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.



