दीड वर्षांत जनतेने तुमचा खरा चेहरा ओळखला; संगमनेरची जनता बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी ठाम – संपतराव डोंगरे

दीड वर्षांत जनतेने तुमचा खरा चेहरा ओळखला; संगमनेरची जनता बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी ठाम – संपतराव डोंगरे
दीड वर्षांत जनतेने तुमचा खरा चेहरा ओळखला; संगमनेरची जनता बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी ठाम – संपतराव डोंगरे

Sangmner vijay kapse दि २ ऑगस्ट २०२६: विकसित संगमनेरला अवैध धंद्यांचे आगर बनवणे, मंजूर विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे, शेतकऱ्यांना शून्य रुपये पीक विमा मिळणे, संगमनेर मार्गे प्रस्तावित नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्प रद्द होणे, वीजपुरवठा आणि पाणी नियोजनात अपयश अशा अनेक मुद्द्यांवरून शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांनी नाव न घेता आमदार अमोल खताळ यांच्यावर जोरदार टीका केली. अवघ्या दीड वर्षांत संगमनेरच्या जनतेने त्यांचा खरा चेहरा ओळखल्याचा दावा त्यांनी केला.

डोंगरे म्हणाले की, संगमनेरचा विकास हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि दूरदृष्टीचा परिणाम आहे. एकेकाळी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाणारा संगमनेर आज राज्यातील विकसित तालुक्यांपैकी एक बनला असून, हा बदल दशकांतील नियोजन आणि जनतेच्या विश्वासामुळे शक्य झाला आहे. या विकासाचे श्रेय दुसऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपसरपंच अरुण गुंजाळ यांनीही आमदारांवर टीका करताना निमज येथील विविध विकासकामे, दलित वस्ती सुधार योजनेतील कामे तसेच अंगणवाडी योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. अनेक कामांना अद्याप प्रशासकीय मंजुरीही मिळालेली नसताना फ्लेक्सद्वारे जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

डोंगरे यांनी पुढे सांगितले की, गेल्या दीड वर्षांत तालुक्यात अवैध धंद्यांना चालना मिळाली, शेतकऱ्यांना शून्य रुपये पीक विमा मिळाला, वीजपुरवठा विस्कळीत झाला आणि मोठ्या प्रयत्नांतून मंजूर झालेला संगमनेर मार्गे नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पही रद्द झाला. या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी केवळ राजकीय आरोप करण्यात वेळ घालवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
शेवटी त्यांनी सांगितले की, संगमनेरमधील तरुण, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आजही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर कायम आहे. आमदारांनी उर्वरित कार्यकाळात तरी सकारात्मक भूमिका घेऊन तालुक्याच्या विकासासाठी काम करावे, अन्यथा विकासात अडथळे आणणे आणि निराधार आरोप करणे थांबवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



