आपला जिल्हा

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. बी. सोनवणे यांचे निधन

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. बी. सोनवणे यांचे निधन

सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले; विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६ : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे विश्वस्त, ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. रामनाथ बी. सोनवणे (आर. बी. सोनवणे) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८२व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगमनेर तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सहकार व कायदे क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जाहिरात

निमगाव भोजापूर येथील रहिवासी असलेल्या ॲड. सोनवणे यांनी आपल्या प्रदीर्घ वकिली व्यवसायासोबतच सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या बळावर देशभरात नावलौकिक मिळविलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे विश्वस्त म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. संगमनेरमधील प्रथितयश कायदेतज्ज्ञ म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती.
गावपातळीवरील विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व करत समाजहिताचे अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली आणि असा मोठा परिवार आहे.

जाहिरात

त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी, “सहकार आणि समाजकारणातील एक ज्येष्ठ सहकारी आपण गमावला आहे,” अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी, “कायदे व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक हरपला,” अशा भावना व्यक्त केल्या.
ॲड. आर. बी. सोनवणे यांच्या निधनाबद्दल बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, सुनील कडलग, विलास वरपे, आनंद वरपे, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ तसेच सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, अमृत उद्योग समूह आणि निमगाव भोजापूर व चिकणी परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे