आपला जिल्हा

कर्जतला जिल्हा सत्र न्यायालयाची मंजुरी; इमारतीसाठी निधी देण्याची मंत्री विखे पाटील यांची ग्वाही

कर्जतला जिल्हा सत्र न्यायालयाची मंजुरी; इमारतीसाठी निधी देण्याची मंत्री विखे पाटील यांची ग्वाही

कर्जतला जिल्हा सत्र न्यायालयाची मंजुरी; इमारतीसाठी निधी देण्याची मंत्री विखे पाटील यांची ग्वाही

जाहिरात

Karjat vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कर्जत येथे जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी मिळाली असून, हा सर्वांच्या पाठपुराव्याचा आणि वकील संघाने केलेल्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तसेच न्यायालयाच्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कर्जत येथील न्यायालयात मंत्री विखे पाटील यांनी वकील संघाचे पदाधिकारी व सदस्यांची सदिच्छा भेट घेतली. राज्य सरकारने जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी दिल्याबद्दल वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष संग्राम ढेरे, उपाध्यक्ष डी. जे. चव्हाण, सचिव अविनाश मते, बाळासाहेब शिंदे, शिवाजी अनुभुळे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, आपण विधी व न्यायमंत्री असताना वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केला होता. त्या संघर्षाला आता यश मिळाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

जाहिरात

या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले.
वकील संघाच्या मागणीनुसार न्यायालयाच्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतानाच, वकिलांच्या स्वतंत्र कक्षासाठी कृषी विभागाची जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. हा प्रस्ताव कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्याची ग्वाहीही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे