आपला जिल्हा

आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

आमदार आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ७ ऑगस्ट २०२६ : कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले. याच उपक्रमांतर्गत सडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काळे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

स्कूल बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नियमित अभ्यासाबरोबरच चांगले संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी उपस्थितांनी सांगितले की, आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदारसंघातील रस्ते, पूल व इतर विकासकामांमुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ झाला आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागावा या उद्देशाने वाढदिवसानिमित्त अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी सडे गावचे सरपंच सतीश बारहाते, ग्रामसेवक चंदकांत जोशी, गणेश बारहाते, संदीप बारहाते, रमेश वाकचोरे, अमोल कोताडे, विजय बारहाते, संतोष बारहाते, अनिल बारहाते, माणिक बारहाते, सुरज बारहाते, वृषाल बारहाते, रुपेश बारहाते, अतुल बारहाते, घनशाम बारहाते, तुकाराम बारहाते, जगन्नाथ बारहाते, पंडित गुंजाळ, सागर बारहाते तसेच शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे