आपला जिल्हा

९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा

९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा

रेल्वेसाठी कला, क्रीडा, साहित्य, युवक, व्यापारी व सर्व क्षेत्रातील नागरिक एकवटले; पद्मश्री रघुवीर खेडकर, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सहभागी होणार

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६: नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राजकीय, सामाजिक, व्यापारी, क्रीडा, कला, साहित्य, सांस्कृतिक तसेच युवक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्ग हा उत्तर व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, प्रस्तावित मार्ग बदलल्यामुळे संगमनेर, अकोले, सिन्नर, नारायणगाव, चाकण, खेड, मंचर आदी भागांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा मार्ग पूर्ववत सरळ व्हावा, यासाठी सर्वपक्षीय स्तरावर जनआंदोलन उभे राहत आहे.

जाहिरात

या आंदोलनाला लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, मंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटे, आमदार शरददादा सोनवणे, आमदार विलास लांडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा लाभला आहे. कला क्षेत्रातील पद्मश्री रघुवीर खेडकर, क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, संगमनेर तालुका व्यापारी असोसिएशन, विद्यार्थी संघटना, पुरोगामी संघटना, साहित्यिक, कलावंत, शेतकरी, महिला तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात

मालपाणी लॉन्स येथे झालेल्या बैठकीत संगमनेर शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी रेल्वे हा विभागाच्या विकासाचा प्रश्न असून त्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तालुक्यासह अकोले, सिन्नर, नारायणगाव, खेड, राजगुरुनगर, मंचर, आळेफाटा आदी भागांतही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
क्रांती दिनानिमित्त रविवारी होणाऱ्या या आंदोलनात समृद्धी महामार्गासह नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या आंदोलनाचे पडसाद केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचतील आणि नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाला न्याय मिळेल, असा विश्वास रेल्वे संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.

 सोशल मीडियावरूनही तरुणांचा उत्स्फूर्त पाठिंबा
नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोशल मीडियावरही मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती आणि विविध युवा संघटनांनी चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट आणि संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, “ज्यांच्यामुळे रेल्वे मार्ग बदलला, तेच आता भेटीगाठी घेत आहेत,” अशी टीका छात्र भारतीचे अनिकेत घुले यांनी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे