आपला जिल्हा

तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन निकम तर सचिवपदी मिलिंद कांबळे

तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन निकम तर सचिवपदी मिलिंद कांबळे

तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन निकम तर सचिवपदी मिलिंद कांबळे

Kopargaon vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६  : तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत सन २०२६–२७ साठी तालुका क्रीडा समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी नितीन निकम, तर सचिवपदी मिलिंद कांबळे यांची निवड झाली.

जाहिरात

सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा संकुलाचे सहअध्यक्ष तथा संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे होते. यावेळी अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, राष्ट्रीय खेळाडू व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पाटणकर तसेच माध्यमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. मागील समितीचे अध्यक्ष धनंजय देवकर यांनी गतवर्षीच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा व समितीच्या कार्याचा आढावा मांडला.

जाहिरात

अरुण चंद्रे यांनी क्रीडा स्पर्धांचे नियोजन, आयोजन व शारीरिक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. मकरंद कोऱ्हाळकर यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सुमित कोल्हे यांनी क्रीडा क्षेत्रात सकारात्मक दृष्टिकोन, पारदर्शकता, शिस्त आणि खेळाडूंप्रती न्याय्य भूमिका ठेवण्याचे आवाहन केले.

सभेत तालुकास्तरावर आयोजित होणाऱ्या १० क्रीडा स्पर्धांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. नूतन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह स्पर्धांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

यक कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदी अजित पवार, राजेंद्र देशमुख, रमेश पटारे,सहाध्यक्षपदी,शिवराज पाळणे, सुनील कदम,सहसचिवपदी रमेश येवले, अशोक गायकवाड, सुरेश सोनवणे, अक्षय येवले,खजिनदार पदी निलेश बडजाते,प्रसिद्धी प्रमुख पदी गौरव डेंगळे,महिला प्रतिनिधी  सुरेखा लांडगे,जिल्हा संपर्क प्रमुख : अनुप गिरमे तांत्रिक समिती : विवेक नायकल, राहुल गोरे यांची निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप गिरमे यांनी केले, तर आभार राजेंद्र देशमुख यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे