आपला जिल्हा

दीड वर्षात रेल्वेचा मार्ग बदलला,तालुक्यात मोठी संतापाची लाट तालुक्याचे नवीन आमदार बाह्य शक्तीच्या हातचे बाहुले

दीड वर्षात रेल्वेचा मार्ग बदलला,तालुक्यात मोठी संतापाची लाट तालुक्याचे नवीन आमदार बाह्य शक्तीच्या हातचे बाहुले

अस्मितेसह संगमनेर तालुका एकवटला, संघर्ष अधिक तीव्र होणार

Sangmner vijay kapse दि १० ऑगस्ट २०२६- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला केंद्रीय रेल्वे मंत्रालय, निधी आयोग, राज्य सरकार महारेल यांच्या सर्व मंजुऱ्या पूर्ण झाल्या. काम ही सुरू केले मात्र मागील दीड वर्षात महायुतीचे सत्ताधारी यांनी राजकीय हेतुने रेल्वेचा मार्ग बदलल्याने पालकमंत्री व संगमनेरचे त्यांच्या हातचे बाहुले ठरलेले नवीन लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात तालुक्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे.

जाहिरात

खरे तर नाशिक – पुणे मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या विकासासाठी नाशिक पुणे सरळ रेल्वे ही नैसर्गिक आणि अत्यंत गरजेची होती याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह या महामार्गावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे हा प्रकल्प मोठा असून तो दोन किंवा तीन वर्षातील नाहीतर त्यासाठी मोठा पाठपुरावा लागतो. या कामी स्वर्गीय अजित दादा पवार,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचेही मोठे सहकार्य लाभले.

जाहिरात

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार, निधी आयोग, महारेल, महसूल विभाग या सर्वांच्या परवानगी पूर्ण होऊन राज्य सरकारने या कामाकरता 1000 कोटी रुपये रेल्वेला दिले. त्यामधून भूसंपादनाचे काम सुरू होऊन 682 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र महायुतीचे सरकार सत्तेवर आले आणि हे काम अचानक थांबले याशिवाय राजकीय हेतू ठेवून सरळ रेल्वे मार्ग ऐवजी नाशिक शिर्डी अहिल्यानगर असा दूरचा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला. आणि हा सरळ रेल्वे मार्ग रद्द करण्यात आला.

यामध्ये पालकमंत्री व संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी संगनमताने जाणीवपूर्वक हा रेल्वे मार्ग बदलला हे स्पष्ट झाले आहे. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी या महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र करून आंदोलनाची हाक दिली केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

जाहिरात

शासन दरबारी पाठपुराव्याबरोबर जनतेमध्ये जनजागृती करून जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. ऑगस्ट क्रांती दिन या सर्व तालुक्यांमध्ये जनता रस्त्यावर उतरली. देशाचे व राज्याचे लक्ष वेधून घेणारा चक्काजाम करण्यात आला. हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीन तास ठिय्या आंदोलन केले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्यासह आमदार सत्यजित तांबे, आमदार शरद सोनवणे, आमदार विलास लांडे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवर रस्त्यावर उतरले.

तरुणाईचा आक्रमकपणा, नागरिकांची साथ महिला अबाल वृद्ध रस्त्यावरती अशा अवस्थेमध्ये सरकारने दडपशाही करत आमदार सत्यजित तांबे यांना अटक केली. यानंतर आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत काम झाले होते आत्ताच कसे थांबले असा सवाल करताना समिती आली म्हणजे धोका अशी भीती व्यक्त केली याचबरोबर ज्या ठिकाणाहून काम थांबले तेथून पुढे सुरू करा असे आवाहन केले.

जनता रस्त्यावर उतरली आहे आता थांबणार नाही ही आंदोलनाची सुरुवात आहे संगमनेर तालुक्याला आंदोलनाचा आणि संघर्षाचा इतिहास आहे नवीन लोकप्रतिनिधी हे सत्ताधाऱ्यांचे हातचे बाहुले आहे. ते त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय संगमनेर तालुक्यामध्ये कोणतेही काम करू शकत नाही याची जाणीव आता संपूर्ण तालुक्याला झाली असून सोशल मीडियावर एका टिप्पणी करणे फ्लेक्स बाजी करणे यांसह तालुक्यात वाढलेली दडपशाही हप्ते खोरी हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे.

सुजलाम सुफलाम आणि समृद्ध असलेला संगमनेर तालुका उध्वस्त करण्यास निघालेली ही मंडळी तालुक्याची बदनामी करत आहेत. तरुणाई आता रस्त्यावर उतरली असल्याचे मोठे चित्र संगमनेरमध्ये पाहायला मिळाले असून यापुढील काळामध्ये संगमनेर तालुका नक्कीच राज्याला दिशा देईल असा ठाम विश्वास सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

महायुती मुळे मार्ग बदलला

संपूर्ण मंजुरी तयारी पूर्ण झालेली असताना फक्त राजकीय द्वेष ठेवून महायुतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संगमनेरच्या विकासाला खोडा घालण्यासाठी हा मार्ग बदलला आहे. मागील दीड वर्षातील हे कट कारस्थान असून या विरोधी जनता आता रस्त्यावर संघर्ष करण्यासाठी तयार आहे.

सिताराम राऊत, संघर्ष समिती

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे